akola department alert mode over corona virus breakout in health Sakal
अकोला

Akola Corona Update : कोरोनाच्या एन्ट्रीमुळे अकोल्यातही यंत्रणा अलर्ट; लक्षणे आढळल्यास उपचार घेण्याचे आवाहन

राज्याच्या विविध भागांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शेजारच्या अमरावती जिल्ह्यातही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

- श्रीकांत राऊत

अकोला : राज्याच्या विविध भागांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शेजारच्या अमरावती जिल्ह्यातही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट असून, सर्व पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना आखण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोनाचा एखादा संशयित रुग्ण आढळल्यास नमुने तपासणीवर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या पावसाळा असल्यामुळे वातावरणातील बदल आणि साथरोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कोरोनाने डोके वर काढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदा उन्हाळ्यात कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत.

आता पावसाळ्यात साथरोगांची लागण वाढली असून, शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णाची संख्या दरदिवशी वाढतच आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर, अमरावती यासह इतर जिल्ह्यातही कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात आरोग्य विभागाकडून सर्व स्तरावर मॉनिटरिंग केले जात आहे.

कुठेही संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणा ॲक्शन घेण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात सुरू करण्यात आलेले स्पेशल वार्ड व इतर यंत्रणा अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जशीच्या तशी कार्यान्वित आहे. कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.

रुग्णालये हाऊसफुल्ल

वातावरणातील बदल, पावसामुळे जागोजागी साचलेल्या पाण्यात होणारी डास उत्पत्ती, दूषित पाण्यामुळे सध्या रुग्णालये अतिसार, व्हायरल फिव्हर, मलेरिया, डेंग्यूसदृश्य तापाच्या आजारांच्या रुग्णांनी भरली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोच्च रुग्णालयात गत १५ दिवसांपासून साथरोगाचे रुग्ण वाढले आहेत.

रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याचे वास्तव आहे. अशातच कोरोनाचे रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणासमोर दुहेरी संकटाचा सामना करण्याचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

अमरावतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप अकोल्यात कोणताही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. सर्व स्तरावर खबरदारी घेतली जात आहे.

- डॉ.मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास उपचार घ्यावे. कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य यंत्रणा पूर्णपणे तयार आहे.

-डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, मेडिसिन विभाग प्रमुख, जीएमसी, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात घसरण कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Latest Marathi News Updates live : नवाब मलिक यांच्या जावयाच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्यात वाढ

Kolhapur Elections : दक्षिण, उत्तर, इचलकरंजी, कागल, शाहूवाडीत दुरंगी लढती; राधानगरी, चंदगडमध्ये बंडखोर जोरात

Nagpur Crime: मृतदेहाला केमिकल लावण्यासाठी मागितले पैसे; नागपूरध्ये धक्कादायक प्रकार

Eknath Shinde: आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? होऊन जाऊ द्या "दूध का दूध पानी का पानी"

SCROLL FOR NEXT