Akola farmers crop Banks loans sakal
अकोला

अकोला : पीक कर्जाच्या रांगेत अजूनही ५७ हजार शेतकरी

जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ७०७ शेतकऱ्यांना ८४५ कोटींचे वितरण

अनुप ताले

अकोला - यावर्षी खरिपात जिल्ह्यातील सर्व बँकांद्वारे एक लाख ४४ हजार ३५० खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ८६ हजार ७०७ शेतकऱ्यांना ८४५.०५ कोटी रुपयांचे म्हणजे, उद्दिष्टाच्या ६८.३१ टक्के पीक कर्ज सर्व बँकाकडून वितरित करण्यात आले असून, ५७ हजार ६४३ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण बाकी आहे.

गेल्या हंगामातील पीक उत्पादनाचा आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना वेळेत मिळेल याची कधीच शाश्‍वती लाभली नाही. शिवाय नेहमीच विविध कारणाने शेतकऱ्यांना पीक नुकसानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे येणाऱ्या हंगामाकरिता त्यांच्याकडे पुरेशी आर्थिक उपलब्धता राहणे कठीण असते. त्यामुळे बहुतांश शेतकरी बँकाकडून पीक कर्ज मिळेल याकरिता आशाभूत असतात. परंतु, हजारो शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने दरवर्षी पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहतात.

यावर्षी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा महागण्यासोबतच मजुरीसुद्धा वाढली. शिवाय गेल्यावर्षी खरिपात विविध कारणांनी सोयाबीन, कापूस, मूग, उडिदाची उत्पादकता घटल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुद्धा बिकट होती. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळणे अत्यावश्‍यक होते. यावर्षी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या माध्यमातून खरीप व रब्बीकरिता एकूण एक लाख ५३ हजार पात्र खातेदार शेतकऱ्यांना १४०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आखण्यात आले होते. खरिपात एक लाख ४४ हजार ३५० शेतकऱ्यांना बँकांद्वारे १२३७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण अपेक्षीत होते. मात्र, ६ जुलैपर्यंत त्यापैकी ८६ हजार ७०७ शेतकऱ्यांना ८४५.०५ कोटी रुपयांचे वितरण झाले असून, उर्वरित उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांद्वारे कळविण्यात आले आहे.

विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेची आघाडी

जिल्ह्यात खरिपामध्ये एकूण एक लाख ४४ हजार ३५० खातेदार शेतकऱ्यांपैकी ८६ हजार ७०७ खातेदार शेतकऱ्यांना जिल्ह्यातील सर्व बँकांमिळून १२३७ कोटी उद्दिष्टापैकी ८४५ कोटी पाच लाख रुपये म्हणजे ६८.३१ टक्के पीक कर्ज वितरित केले. त्यामध्ये यावर्षी विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेने आघाडी घेतली असून, १५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना, १५ हजार ८०५ खातेदारांना १२० कोटी उद्दिष्टापैकी १७१.०७ कोटी रुपयांचे, म्हणजे १४२ टक्के पीक कर्ज वितरित केले आहे. जिल्हा बँकांनी सुद्धा रकमेच्या स्वरुपात सर्वाधिक पीक कर्ज वितरित केले असून, ७० हजार खातेदार शेतकऱ्यांपैकी ५१ हजार ९७५ शेतकऱ्यांना ६०५ कोटी उद्दिष्टापैकी ४७६.८३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे.

नागरी क्षेत्रातील बँकांनी ५३ हजार ६५० खातेदारांपैकी १८ हजार २५३ खातेदारांना ४४५.५५ कोटी उद्दिष्टापैकी १८३.९५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले. खासगी बँकांनी ५७०० खातेदारांपैकी ६७४ खातेदारांना ६६.४५ कोटी उद्दिष्टापैकी १३.२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले.

यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा अधिक प्रमाणात पीककर्ज वितरण झाले आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी कँप घेण्याचे सुद्धा बँकांना निर्देशित करण्यात आले असून, नियमित पाठपुरावा व बैठकी आयोजित करून सर्व खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचे उपाय केले जात आहेत. जुलैमध्ये ९० टक्क्याहून अधिक उद्दिष्ट पूर्ती होईल व १५ ऑगस्ट पर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.

- नयन सिन्हा, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT