Akola farmer sowing delay sakal
अकोला

अकाेला : अपुऱ्या पावसाने पेरण्या खोळंबल्या

उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती, सर्वदूर पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : मृग नक्षत्र संपून आठवडा उलटत असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पाऊस खंडित स्वरूपात पडत असल्याने सर्वच तालुक्यात अनेक गावे अजूनही भेगाळलेलीच आहेत. पेरणीला उशीर झाल्यास उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आहे. यावर्षी तब्बल ३ लाख ६० हजार क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली येण्याची शक्यता असताना यावर्षी पावसाने चांगलाच दगा दिला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानोरा व कारंजा तालुक्यातील काही गावांत समाधानकारक पाऊस पडल्याने तेथील पेरण्या आटोपल्या होत्या.

चार दिवसांपूर्वी मालेगाव रिसोड व वाशीम तालुक्यातील काही गावात पावसाने हजेरी लावल्याने या गावातील पेरण्या आता सुरू झाल्या आहेत. मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत फक्त दहा ते बारा टक्केच पेरण्या झाल्या आहेत. या कारणाने शेतकरी चिंतेत आहेत. गतवर्षी दहा ते चौदा जूनपर्यंत जिल्ह्यातील पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी पेरणीला उशीर होत असल्याने उत्पन्नात घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हळदीचा पेरा घटला

जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून हळद पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली होती. गतवर्षी सरासरी बाराशे ते पंधराशे हेक्टर क्षेत्रात हळदीची लागवड झाली होती. यावर्षी मात्र यामध्ये घट होत आहे. उन्हाळ्यात एकदाही पाऊस न आल्याने हळद पिकाकरीता जमीन तयार करता आली नाही. आता पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांनी हळदीचे नियोजन केले होते, मात्र जून महिना संपत आला तरी पाऊस नसल्याने नऊ महिन्यांत येणारे हळद पीक लांबण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी हळदीला बगल दिली आहे.

अस्मानीबरोबर सुलतानी संकट

एकीकडे पाऊस लांबत असताना खतांसाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत. प्रशासन डिएपी खताचा मुबलक साठा असल्याचा दावा करीत असले, तरी खते लिंकिंग पद्धतीने सर्रास विकली जात आहेत. त्यात खतांच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT