Akola farmers in merit Nitin Gadkari at Amrut Sarovar Dedication Ceremony sakal
अकोला

अकोला : शेतकऱ्यांना ‘मेरिट’ मध्ये आणायचेय; नितीन गडकरी

डॉ. पं. दे. कृ. विद्यापीठात अमृत सरोवर लोकार्पण सोहळा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शेतीच्या बाबतीत विदर्भातील शेतकरी हा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत नापास विद्यार्थी आहे. त्याला मेरिटमध्ये आणायचे आहे. त्यासाठी ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर यापुढे भर दिला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित अमृत सरोवर लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, डॉ. विलास भाले, पशू व मत्स्यविज्ञान विद्यापाठीचे कुलगुरू, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती होती.

श्री. गडकरी पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील समस्यांचे मूळ पाण्यात आहे. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध करण्यासाठी रस्त्यांसोबत तलाव निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग बुलडाणा जिल्ह्यात झाला. अकोला जिल्ह्यात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सहकार्यामुळे ३४ तळी तयार झाली. त्यातून २२ गावांच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे येथील शेतकरी लिंबासारखी शेती करून उत्पादन वाढवू शकला.

हायड्रोजनचे उत्पादन घ्या

अतिशय कमी खर्चात शेतकरी संपूर्ण देशाच्या इंधनाची गरज भागवू शकतो. त्यामुळे हायड्रोजन, इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

देशी गायींच्या संशोधनावर भर

येणाऱ्या काळात देशी गायींच्या संशोधनावर भर देऊन दोन लिटर दूध देणाऱ्या विदर्भातील गायीला २० लिटर दूध देणारी गाय करायचे आहे. विद्यापीठांनीही यावर भर दिला पाहिजे. गरज लक्षात घेऊन संशोधन करण्याचा सल्लाही नितीन गडकरी यांनी विदर्भातील कृषी व पशुसंवर्धन विद्यापीठाला दिला.

...तर मोठी धरणे बांधण्याची गरज नाही

रस्त्याचे काम बघत असताना रस्त्याच्या बाजूला झालेल्या तळ्यांचीही पाहणी केली. हे काम विदर्भात सर्वत्र झाले तर मोठी धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. बुलडाणा जिल्ह्याने यात चांगले काम करून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. १३२ तळी, २५ शेततळी, ८१ गावतलाव तयार झाल्याने २२ हजार विहिरींची पाण्याची पातळी वाढली. १५२ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT