Akola Gandhigram Purna River bridge  
अकोला

Akola : गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पूल बनला

अकोट-अकोला मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलाची परिस्थिती बिकट झाल्याने पुलाला खालच्या बाजूने मधोमध मोठी किर पडली आहे व वरच्या बाजूने पूल खाली दबला आहे. त्यामुळे एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पुन्हा एकदा अकोट-अकोला रस्ता पूर्णपणे बंद केला आहे.

अकोला-अकोट मार्गावर गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलाला तडे गेल्याने ता. १८ ऑक्टोबर रोजी दुपारपासून या रस्यावरील वाहतूक बंद करून अकोट-अकोला रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली होती. परंतु, त्यानंतर दिवाळी सण पाहता हा रस्ता पायदळ प्रवासासाठी खुला करण्यात आला.

प्रवाशांचे जास्त हाल होऊ नये, त्यांची जास्त आर्थिक लूट होऊ नये या हेतूने जिल्हा प्रशासनाकडून अकोला बस स्थानक एक व दोनमधून अकोला ते गांधीग्राम अशा बसेसची सुविधा करण्यात आली. तशीच सुविधा अकोट येथील आगारातील एक बस सोडून प्रवाशांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

परंतु, आजरोजीची पुलाची परिस्थिती पाहता या ठिकाणी कुठलीही गंभीर घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पुलावर दोन्ही बाजून लोखंडी पाईप लाऊन पायदळ प्रवासही बंद करण्यात आला असून, या मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली.अकोला-अकोट या मार्गाचे बांधकाम गेले पाच वर्षांपासून रखडले आहे. तीन वर्षांपूर्वी नवीन पुलाचे बांधकाम केले.

मात्र, त्याला पोचमार्गच नसल्याने हा पूल असूनही वाहतुकीच्या कामात आला नाही. त्यात आता गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील पुलाला तडे गेले व काही भाग खचला आहे. त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली.

गांधीग्रामच्या पुलाची मुदत संपलेली असल्याने गोपालखेड शिवारातून जाणाऱ्या मार्गावर नवीन पूल बांधण्यात आला आहे. मोठ्या पुलासह अन्य छोटे पुलही तयार असून, केवळ या पुलापर्यंत जाणारा पोच रस्ता तयार न झाल्याने सध्या जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. गत अनेक वर्षांपासून वाहतुकीची वर्दळ आणि पुराचे तडाखे सहन करणारा हा पूल सध्या शिकस्त झाला आहे. पुलाचा काही भाग दबल्याचे आणि खालच्या बाजूला भेगा दिसत असल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून दुपारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

अकोला ते अकोटकरीता पर्यायी मार्ग

आपतापा चौक, म्हैसांग-रामतीर्थ, नंदरून, दहीहंडा, दहीहंडा फाटा, चोहट्टा मार्गे अकोट. वाशीम बायपास चौक ते गायगाव, उरळ, निंबा फाटा, देवरी मार्गे अकोट, असा पर्यायी मार्ग असून, याच मार्गे अकोट ते अकोला अशी वाहतूक वळवण्यात आली आहे.

गांधीग्राम येथील पूर्णा नदीचा पूल कमजोर झाल्याने हा पूल दोन्ही बाजूने लोखंडी पाईप लावून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर पुलावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक बंद झालेली आहे, तरी नागरिकांनी इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.

- सुरेंद्र राऊत, ठाणेदार, दहीहंडा पोलिस स्टेशन.

गांधीग्राम येथील पुलाची परिस्थिती बिकट झालेली आहे, पुलाला खालच्या बाजूने मधोमध मोठी किर पडली आहे व वरच्या बाजूने पूल (रस्ता) खाली दबला आहे, या ठिकाणी एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येत आहे व गांधीग्राम पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

- विलास पाटील, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक, अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT