Akola Khandwa Track gauge conversion 
अकोला

अकोला-खंडवा गेजपरिवर्तन मेळघाटाबाहेरून

सकाळ वृत्तसेवा

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला-खंडवा रेल्वेमार्गाचे गेजपरिवर्तन मेळघाटाबाहेरून करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग दिला आहे. जमीन अधिग्रहण आणि नवीन मार्गाबाबत सिंकदराबाद रेल्वे विभागातर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. विद्यमान मार्ग बदलून नवीन मर्गाने गेजपरिवर्तन करताना या मार्गाची लांबी २९ मीटरने वाढणार आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते खंडवापर्यंत रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याचे काम १९९४ पासून सुरू करण्यात आले. टप्प्याटप्प्याने हे काम केले जात आहे. अकोला ते अकोटपर्यंतचे गेजपरिवर्तन झाले आहे. उर्वरित मार्ग मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या राखीव वनक्षेत्रातून जात असल्याने पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. त्यामुळे अकोट ते अमलाखुर्दपर्यंतचे ७७ किलोमीटरचे गेजपरिवर्तन रखडले होते.

या रेल्वेमार्गाच्या गेजपरिवर्तनाला होत असलेला विलंब बघता मेळघाटाच्या बाहेरून हा मार्ग तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाला दिले आहेत. त्यानुसार या विभागाने जमीन अधिग्रहण आणि नवीन मार्गाच्या सर्वेक्षणाला गती दिली आहे.

धुळघाट, वानरोड, डाबका स्टेशन होणार बंद

अकोट ते खंडवापर्यंत नवीन रेल्वेमार्ग तयार करताना जुन्या रेल्वेमार्गावरील धुळघाट, वानरोड, डाबका स्टेशन बंद होणार आहे. नवीन मार्ग अडगाव, हिवरखेड, सोनाळा, जामोद, खकनार, खिकरी मार्गे तुकाईथड येथे जुन्या मार्गावर जोडला जाणार आहे.

वन विभागाच्या परवानगीचा प्रश्न कायमच

अकोट ते खंडवापर्यंत रेल्वेमार्ग तयार करताना नवीन पर्यायी मार्गाचा वापर केला जात आहे. पूर्वीच्या मार्गात राखीव वनक्षेत्राचा प्रश्न निकाली न निघाल्याने नवीन मार्गाचा पर्याय निवडण्यात आला. मात्र, या मार्गावरही २० किलोमीटरपर्यंत वनविभागाची जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळवून जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश रेल्वे विभागाला देण्यात आले आहे. त्यात मध्य प्रदेशातील १५ तर महाराष्ट्रातील पाच किलोमीटर वनजमिनीचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुती सरकारनं काढलेला SC-ST उपवर्गिकरणासंबंधीचा जीआर रद्द होणार? राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचे संकेत

IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्स फक्त ३ खेळाडूंना रिटेन करणार, नावं समजली; कोचच्या पदासाठी भारताचा माजी फलंदाज आघाडीवर

Latest Maharashtra News Updates : वाघोली, खराडी भागात पावसाला सुरुवात

Buldhana Assembly Election 2024 : दिवाळीच्या थंडीत राजकारण तापणार! फटाके कोण फोडणार आणि कुणाला लागणार याचीच सर्वत्र चर्चा

IND vs NZ 1st Test : बंगळुरूचा पाऊस टीम इंडियाचे WTC Final Scenario बिघडवतोय; रोहित शर्माचं टेंशन वाढवतोय

SCROLL FOR NEXT