Akola Loksabha 2024 esakal
अकोला

Akola Loksabha 2024: आंबेडकरांच्या मतदारसंघात मराठा आरक्षण ठरणार कळीचा मुद्दा! 'गड' राखण्यासाठी भाजपची धावपळ

Akola Loksabha 2024: अकोला जिल्हा भाजपचा गड असून खासदार व विधानसभेचे चार आमदार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अकोला जिल्हा परिषदेवर गेले दोन दशकाहून अधिक काळापासून भारीप, वंचितची सत्ता आहे.

Sandip Kapde

Akola Loksabha 2024:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोमाने तयारी सुरू केली आहे. विविध उपक्रम राबवून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवण्यासह संघटनात्मक बांधणीवर जोर दिला जात आहे. यामध्ये भाजपने आघाडी घेतली, तर काँग्रेसने सुस्तच राहण्याची परंपरा काही सोडली नाही. वंचितने आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष चर्चेत ठेवला. राष्ट्रवादी व शिवसेना दुभंगल्यामुळे त्यांच्यापुढे नव्याने उभे राहण्याची खडतर वाट आहे.

निवडणुकांमध्ये पोषक वातावरण राहण्यासाठी नेत्यांकडून मशागत केली जात असल्याचे चित्र आहे. अकोला जिल्हा भाजपचा गड असून, खासदार व विधानसभेचे चार आमदार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अकोला जिल्हा परिषदेवर गेले दोन दशकाहून अधिक काळापासून भारीप, वंचितची सत्ता आहे. या दोन्ही पक्षांनी सुक्ष्म स्तरावर निवडणुकीचे नियोजन सुरू केले.  अमित शाह अकोल्यात दोन लोकसभा क्लस्टरमधील मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

अकोला जिल्ह्यातील अकोला महापालिका, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर आणि मूर्तिजापूर नगर पालिकांचा कार्यकाळ संपून सुमारे दीड वर्षांचा कालावधी झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर होतील, हे आता स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले असून, नेते व इच्छूक तयारीला लागले आहेत.

निवडणुकीच्या तयारीत नेहमीप्रमाणे भाजपने आघाडी घेतली. भाजपने निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक फेरबदल करून खांदेपालट केली. अकोला भाजपच प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचे पक्षावर निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांचे निकटवर्तीय किशोर मांगटे यांची जिल्हाध्यक्ष, तर महानगराध्यक्ष पदावर जयंत मसने यांची नियुक्ती करण्यात आली.

अनुप धोत्रे यांच्यावर लोकसभेची तर विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार आदींवर विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमधून सामाजिक समतोल देखील भाजपने साधला. जिल्ह्यातील पक्षाचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी भाजपकडून तळागाळातून मोर्चेबांधणी केली जात आहे. Akola Loksabha 2024

जिल्ह्यातील दुसरा मोठा पक्ष व भाजपचा प्रमुख विरोधक म्हणून वंचित आघाडीकडे बघितल्या जाते. लोकसभा निवडणुकीत भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत असल्याचा गेल्या दोन दशकांतील इतिहास आहे. आता पुन्हा एकदा ॲड.प्रकाश आंबेडकर व महाविकास आघाडीची बोलणी सुरू आहे. ते एकत्र आल्यास भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण होईल. गटातटात विभागलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यातच काँग्रेसमधील अंतर्गत वाद हे या पक्षासाठी मारक ठरत आले आहे.  राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. युतीमध्ये बाळापूरमधून शिवसेनेचे आमदार २०१९ मध्ये निवडून आले.

मात्र, आता भाजपची साथ सुटण्यासोबतच पक्षात देखील दोन गट पडले. शिवसेना ठाकरे गटाला ग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात जनाधार आहे. शहरी भागात मात्र त्यांना अस्तित्वाचा लढा द्यावा लागेल. शिवसेना शिंदे गटाला तळागाळातून नव्याने उभारणी करावी लागणार आहे. त्याचे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. राष्ट्रवादी पक्ष अगोदरपासूनच जिल्ह्यात कमकुवत आहे. आता दोन गटातील विभागणीमुळे त्यांच्यापुढे अस्तित्व राखण्याचे आव्हान आहे.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी शहरावर अधिक लक्ष केंद्रित केले. मात्र, त्यांची वाट बिकट असल्याचे दिसून येते. अकोला शहरात मे महिन्यातच दंगल उसळली होती. विधानसभा व महापालिका निवडणुकीमध्ये दंगलीचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून राजकीय चढाओढ रंगणार आहे. दंगल झालेल्या जुने शहर भागातच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी व्याख्यान घेऊन मुस्लिम धर्मावर टीकास्त्र सोडले. या व्याख्यानाशी हिंदुत्ववादी संघटना जुळल्या होत्या. त्याचा प्रभाव मतपेटीवर पडू शकतो.

वंचित वगळता सर्वच पक्षांना उमेदवाराचा शोध-

जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक स्थिती ही भाजपच्या पक्षात दिसत असली तरी यावेळी भाजपला उमेदवारच बदलावा लागणार आहे. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या आजारपणामुळे त्यांचा वारसदार शोधण्यात भाजपची सर्व शक्ती खर्च होत आहे. विद्यमान खासदार व प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्या बाबत पक्षात सहानुभूती असली तरी भाजपच्या पक्षांतर्गत मतदारसंघातील सर्व्हेत त्यांच्याबाबतची नाराजीही दिसून आल्याची चर्चा आहे. त्यातच खासदार धोत्रे यांच्या घरातूनही उमेदवारीसाठी त्यांचा मुलगा इच्छुकांच्या रांगेत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातून अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचे नावही चर्चेत आले होते.

मात्र, त्यांचा मुलगा नकूल देशमुख हा विधानसभेसाठी इच्छुक असल्याने अनंतरावांचे नाव मागे पडले आहे. भाजपसाठी मतदारसंघ खेचून आणणारे भाऊसाहेब फुंडकर यांचे वारसदार आमदार आकाश फुंडकर यांचेही नाव चर्चेत आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून निवडणूक लढवून इच्छिणाऱ्यांची मोठी यादी असल्याने त्यांच्या चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.

स्वतः जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रदेश कार्यकारिणीतील प्रशांत गावंडे, डॉ. सुधीर ढोणे, साजिदखान पठाण, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन व आता नव्याने नव्याने सहकार क्षेत्रातील डॉ. श्रीकांत तिडके हे नावही या स्पर्धेत आले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवारीवर एक मत न झाल्यास शिवसेना या मतदारसंघात माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी या मतदारसंघात भाजप-काँग्रेस-वंचित अशी तिरंगी लढतच दिसत आहे.

मराठा आरक्षण ठरणार कळीचा मुद्दा-  

अकोला जिल्ह्यात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. कुणबी, पाटील व देशमुख मिळून तीन लाखांच्यावर मतदार आहेत. दोन ते अडीच लाख ओबीसी मतदार असून, सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकांमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे.

अकोला जिल्ह्यात मराठा व ओबीसी मतदानानंतर अनुसुचित जाती व जमातीचे सुमारे तीन लाख मतदार असून, दोन लाख ७५ हजारांच्यावर मुस्लीम मतदार अकोला लोकसभा मतदारसंघात आहेत. मराठा-ओबीसी, मुस्लिम व बौद्ध अशी मतदारांची सामाजिक विभागणी या मतदारसंघात होते. त्याचा थेट प्रभाव आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. सहकार गटाचेही जिल्ह्यात प्राबल्य असून, एक ते सव्वा लाख सहकार गटातील मतदार हे निवडणुकीच्या निकालावर प्रभाव टाकत आले आहे.

१) अकोला पश्चिम

हा भाजपचा गढ राहिला आहे. काँग्रेस व भाजप यांच्यात चुरशीच्या लढती आतापर्यंत होत आल्यात. सहावेळा भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळविला. गतवेळी अवघ्या अडीच हजार मतांनी ते विजयी झाले होते. यावेली आमदार शर्मा यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे ते निवडणूक लढणार नाही. त्यांच्या जागी भाजपकडून नवीन उमेदवार शोधला जात आहे. अनेकांची नावे पुढे असून, त्यांच्यात उमेदवारीवरून चुरस आहे. त्यातच काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटानेही या मतदारसंघात कंबर कसली आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात चुरशीची लढत बघावयास मिळणार आहे.

२) बाळापूर

अकोला जिल्ह्यातील कायम अनिश्चित निकाल देणारा मतदारसंघ म्हणून बाळापूरकडे बघितले जाते. पातूर व बाळापूर या दोन तालुक्यात विखुरला असलेल्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. वंचित बहुजन आघाडीनेही या मतदारसंघात यापूर्वी दोन वेळा विजय मिळविला होता. त्यापूर्वी काँग्रेस व भाजपचे वर्चस्व राहिले होते. गतवेळी शिवसेनेने विजय मिळवला. यावेळी शिवसेनेला भाजपची साथ मिळणार नाही. भाजपने सामाजिक समिकरणात या मतदारसंघामध्ये मराठा व माळी समाजावर लक्ष केंद्रीत केले आहे.दुसरीकडे शिवसेना विद्यमान आमदारांसोबत या मतदारसंघात लढण्याची शक्यता आहे. एमआयएमकडूनही उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. (

३) अकोट

अकोट मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनांचा बोजवारा व विकासाचे कोणतेही ठोस काम गेले दहा वर्षांत झाले नाही. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला पर्यायी उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यातच प्रहारने या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीकडून माळी व बारी समाजाला सोबत घेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे मराठा (कुणबी), मुस्लिम, बौद्ध व माळी, बारी असे सामाजिक समिकरण येथे तयार होते. त्यात कुणबी व माळी समाजातील उमेदवार या मतदारसंघात दिल्यास त्यांच्यात चुरशीचे लढत होत असल्याचे आतापर्यंतच्या निकालावरून दिसून येते.

लोकसभा मतदार संघातील निकाल-

उमेदवार    पक्ष           मिळालेली मते    
१) संजय धोत्रे (विजयी)   भाजप          ५,५४, ४४४  (४९.५३ टक्के)
२) प्रकाश आंबेडकर        वंचित         २,७८,८४८ (२४.९१टक्के)
३) हिदायत पटेल           काँग्रेस          २,५४,३७० (२२.७२ टकक्के)

अकोला लोकसभेंतर्गत येणारे विधानसभा मतदारसंघ -

१) अकोला पूर्व
२) अकोला पश्चिम
३) अकोट
४) बाळापूर
५) मूर्तिजापूर
६) रिसोड (वाशीम जिल्हा)

विधानसभानिहाय निकाल-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT