अकोला: शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत ज्यांनी हिंसाचार घडवून आणला त्यांच्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते का बोलत नाहीत, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यावर पलटवार केला आहे. दिल्ली हिंसाचाराला जबाबदार असलेले अभिनेते दीप सिद्धू हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. त्यावर शेलार का बोलले नाहीत? असा परखड सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच सिद्धू तुमचा कोण लागतो?, असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा - ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 27, 2021
अमोल मिटकरी यांनी ट्विट करून आशिष शेलार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. शेलार हे भाजप व संघाचे गुलाम असून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याचे मूकपणे समर्थन करीत आहेत.
दिल्लीच्या हिंसाचारा मागे भाजपचा कार्यकर्ता दीप सिद्धू असल्याचा आरोप शेतकरी का करत आहेत? याचे उत्तर शेलार यांनी दिले नाही, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 27, 2021
दोनच ट्विटमध्ये मिटकरींनी शेलारांना घेरलं
मिटकरी यांनी दोनच ट्विट करून शेलार यांना घेरलं. दुसऱ्या ट्विटमध्ये तर त्यांनी थेट दीप सिद्धूवरून शेलारांना सवाल केला आहे. आशिष शेलार साहेब, खरं सांगा दीप सिद्धू तुमचे कोण?, असा परखड सवाल त्यांनी शेलार यांना केला आहे.
काय म्हणाले होते शेलार?
आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी चर्चा करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. शेलार यांनी खासकरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
“कधी काळी आवश्यक वाटल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार… कालच्या घटनेवर तुम्ही फेसबुक पोस्ट का टाकली नाही… पवारसाहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही… आंदोलनात जो वावर आणि वाद पहिल्यापासून चालू आहे त्याचे समर्थन शरद पवार , संजय राऊत यांनी केलं. मग काल हे सगळं घडल्यावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंड आता का शिवली?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी केला आहे.
संजय राऊत यांना सवाल
“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, रोज कोणत्याही विषयावर बोलायला जमतं मग काल देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?”, असा सवालही त्यांनी केला होता.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.