मोताळा (जि.बुलडाणा) ः एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय युवतीचा विनयभंग करून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली. तसेच भावी नवरदेवास फोन करून तिचे लग्न मोडले.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुरुवारी (ता.६) गुन्हा दाखल केला आहे.
नांदुरा तालुक्यातील खैरा येथील २२ वर्षीय युवतीने बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, पीडिता ही २०१६ ते २०१९ या कालावधीत मोताळा येथील एका महाविद्यालयात शिक्षणाला होती.
दरम्यान,२० डिसेंबर २०१९ पासून प्रतिक भारसाखळे (वय २५, रा. मोताळा) हा युवक अधून मधून कॉलेजच्या रस्त्याने दुचाकीवर चक्कर मारत होता. माझी कॉलेज वरती ओळख आहे. तुला परीक्षेच्या वेळी अडचण आल्यास मदत करेन, असे म्हणुन प्रतिकने तिच्याशी मैत्री केली.
तिला दोन-तीन वेळेस दुचाकीवर कॉलेजपासून बसस्थानकावर आणून सोडले. दरम्यान, एकदा त्याने जबरदस्ती तिचा हात पकडून तिला दुचाकीवर बसवून अंगलट करत विनयभंग केला.
त्यामुळे पीडिता त्याच्या दुचाकीवरून उतरली व त्याच्या सोबतची मैत्री सोडून दिली. मात्र, प्रतिक तिचा पाठलाग करू लागला. तिला फोन करून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुला माझ्या सोबतच लग्न करावे लागेल’, असे म्हणू लागला. पीडितेने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी दिली.
तसेच तिच्या आजी, आजोबा व मामा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित युवतीची खामगाव येथील युवकासोबत सोयरीक जुळली व त्यांचा साक्षगंध झाला. त्यानंतर प्रतिक भारसाखळे याने भावी नवरदेवाशी फोनवर संपर्क साधला व ‘त्या मुलीसोबत माझे प्रेम आहे.
मी तिच्यासोबत लग्न करणार आहे’, असे सांगितले. त्यामुळे तिचे लग्न मोडले आहे. त्यानंतर पीडित युवतीने कुटुंबियांना सदर प्रकार सांगितला.
याप्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी प्रतिक भारसाखळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक रोकडे, पोकाँ संजय गोरे करीत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.