Sand Smuggling sakal
अकोला

Akola News : जिल्ह्यातील ३७ वाळू घाटांना सुरक्षा!

चोवीस तास पहारा; तीन शिफ्टमध्ये नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सन् २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित ३७ वाळू घाटांचा ई-लिलाव करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू असल्यामुळे सदर वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन होऊ शकते. या बाबत खनिकर्म विभागाला अनेक तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे लिलाव प्रस्तावित ३७ वाळू घाटांवर बैठे पथकांद्वारे वॉच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू तस्करीवर आळा बसेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाचे नियोजन खनिकर्म विभागामार्फत करण्यात आले आहे.

त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३७ वाळू घाट ई-लिलावाकरिता निश्‍चित करण्यात आले आहेत. सदर वाळू घाटांचे तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीची प्रक्रिया सुद्धा पार पडली. दरम्यान पर्यावरण विषयक समितीची परवानगी घेवूनच वाळू घाटांचा ई-लिलाव करण्यात येईल.

दरम्यान सदर वाळू घाटांचा लिलाव करण्यापूर्वीच त्यामधून अवैध वाळू उत्खनन होऊ शकते. त्यामुळे वाळू घाटासाठी ई-लिलावात भाग घेणाऱ्या कंत्राटदाराला कमी प्रमाणात वाळू मिळू शकते. त्याचा फायदा कंत्राटदाराला कमी तर अवैध वाळू उत्खनन करणाऱ्याला अधिक होऊ शकतो.

या बाबत काही कंत्राटदारांनी खनिकर्म विभागाकडे तक्रारी सुद्धा केल्या आहेत. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सदर वाळू घाटांवर महसूल व पोलिस कर्मचारी यांनी नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अवैध वाळू उत्खननावर पथकांचा वॉच असेल.

रात्रीच्या वेळी पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती

स्थायी पथकामध्ये नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, पोलिस कर्मचारी व तलाठी यांचा समावेश करावा. एका दिवसाला तीन शिफ्टमध्ये पथकाची नियुक्ती करावी. प्रत्येक शिफ्टमध्ये केवळ दोनच कर्मचारी यांची नियुक्‍ती करावी. महिला कर्मचारी यांची नियुक्ती फक्त दिवसाच्या दोन शिफ्टमध्ये करावी. पोलिस शिपाई यांची नियुक्ती ही केवळ रात्रीच्या शिफ्टमध्ये करावी, असा उल्लेख जिल्हाधिकारी यांनी ६ जानेवारी रोजी जारी केलेल्या आदेशात केला आहे.

या वाळू घाटांवर राहणार पहारा

  • अकोला तालुक्यातील कपिलेश्वर, वडद बु., एकलारा, उगवा, कट्यार, म्हैसांग.

  • अकोट तालुक्यातील केळीवेळी, पिलकवाडी.

  • तेल्हारा तालुक्यातील तळेगांव, पातुर्डा, वांगरगांव.

  • मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी, विरवाडा, दापुरा कोळसारा, खापरवाडा, खैरी, घुंगशी, हसनापूर दुर्गवाडा, लोनसाना, सांगवामेळ, सांगवी, बपोरी, पिंगळा.

  • बाळापूर तालुक्यातील बहादुरा, काजीखेड, हिंगणा शिकारी, निंबी, मोखा, सागद, मांजरी, जानोरी मेळ, हाता, लोहारा, डोंगरगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT