देऊळगावराजा (जि.बुलडाणा) ः प्रती तिरुपती श्री. बालाजी महाराज यांचा तीनशे ऐंशी वर्षाची परंपरा लाभलेल्या धार्मिक उत्सवाला कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परवानगी नाकारल्याने खंड पडला. लाटा मंडप उभारला गेला नाही. पालखी मिरवणूक निघाली नाही. ललित साजरा होणार नाही. एकीकडे राजकीय दसरा मेळावा साजरे झाले; मात्र तिरुपतीचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या येथील श्री व्यंकटेश बालाजी महाराजांचे सर्व धार्मिक उत्सवाला परवानगी नसल्याने भाविक भक्तांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
याचबरोबर पालक मंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक उपविभागीय अधिकारी यांनी बालाजी मंदिराला भेट देऊन होणाऱ्या उत्सवा संदर्भात माहिती घेतली. यादरम्यान त्यांनी सकारात्मक भावना व्यक्तही केल्या. परवानगी मिळेल या अपेक्षेने संस्थांच्या माध्यमाने पालखी मिरवणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली. ऐनवेळी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्याच्या विनंतीला प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. परिणामी आमना नदीवर सीमोल्लंघनासाठी बालाजी महाराजांना एका वाहनात विराजमान करून मिरवणुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यात आले. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून राज्यभरात धार्मिक उत्सवाला परवानगी नाकारण्यात आली तर अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसरा सणा निमित्त काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्यात गर्दी झाली. मात्र साडेतीनशे वर्षात प्रथमच हा उत्सव साजरा होत नसल्याने बालाजी भक्तांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. दसरा मेळावा साजरे झाले; मात्र धार्मिक परंपरा खंडित झाल्याची खंतही व्यक्त होत आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.