अकोट (जि.अकोला) : अकोट येथील नेहमीप्रमाणेच आजचीही पहाट उजळली. मात्र, या पहाटेच्या वेळी सुदृढ आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करीत असलेल्या चौघा जणांना अचानक येणाऱ्या भरधाव टेम्पोनं चिरडलं आणि सर्व काही संपलं.
ही घटना अकोट-अंजनगाव मार्गावर गुरुवारी (10 डिसेंबर) पहाटे घडली. या घटनेत तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समजते. अपघात इतका भीषण होता की, टेम्पो देखील रस्त्याच्या कडेला उलटला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शालिग्राम उत्तमराव राऊत (वय- 60), उत्तमराव किसनराव नाठे (वय-60) व गजानन नेमाडे (वय-55) अशी मृतांची नावं आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील अकोट अंजनगाव मार्गावरील परिसरात नागरिक हे पहाटे फिरायला जात असतात. हा रस्ता राज्य महामार्ग असला तरी हा रस्ता पादचाऱ्यांसाठी फिरायला सुरक्षित आहे. टेम्पो (एमएच 20 डीई 7433) हा भरधाव आला आणि त्याने पादचाऱ्यांना चिरडले. यामध्ये तीन पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. इतर एक जखमी झाले आहेत. या जखमीला अकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शेतकऱ्याच्या घरात भरधाव कंटेनर घुसून अंगणात खेळणाऱ्या सख्ख्या बहिणींना चिरडल्याची घडना समोर आली आहे. जालना ते सिंदखेड राजा रोडवरील नाव्हा शिवारात हा अपघात (Accident)घडला. या अपघाताने या शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला असून मुलींच्या मृत्यूमुळे सर्व शिवारातच शोककळा पसरली आहे.
जालना ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नाव्हा शिवारात हायवेला लागूनच एका शेतकऱ्याचे झोपडीवजा घर आहे. घराच्या समोर छोटसं अंगण आणि त्याला लागून हायवे जातो. याच अंगणात या शेतकऱ्याच्या मुली खेळत होत्या. त्यातली एक 5 तर दुसरी 7 वर्षांची होती. खेळण्यात दंग असतानाच अचानक एक मोठा कंटेनर वेगात त्या अंगणातून सरळ घरामध्ये घुसला. त्यावेळी अंगणात खेळत असलेल्या मुली त्या कंटनेरखाली सापडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे घराचेही नुकसान झालं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा कंटनेर मार्गावरून भरकटला आणि या घरामध्ये घुसल्याचं सांगण्यात येतेय. माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरच्या ड्रायव्हरची पोलीस चौकशी करत असून गाडीची कागदपत्रही तपासण्यात येत आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.