अकोला : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारीरोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होणार आहे.
त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. दरम्यान आता डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत राज्यातील सुमारे ४ जिल्ह्यांमधील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. दरम्यान आता संबंधित ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे.
|
|||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.