Akola News If you want a job, run, run, lets fill the application, seven thousand vacancies in MSEDCL 
अकोला

नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा

विवेक मेतकर

अकोला : नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उप-केंद्र सहायक (२०००) व विद्युत सहायक (५०००) अशा तब्बल ७ हजार पदांची भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत ही पदे तातडीने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

अकोला जिल्ह्यातील  बातम्यांसाठी क्लिक करा

महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असून, ही पदे भरण्याबाबत रेटा वाढला होता. याची दखल घेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी २३ जून रोजी उपकेंद्र सहायक व विद्युत सहायकांची पदे भरण्याचे आदेश २३ जून रोजी दिले होते; परंतु कोरोना संकटाच्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

मंगळवार, ४ जून रोजी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ही पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.

भरती दोन टप्प्यात 
महावितरणकडून ही भरती दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उप-केंद्र सहायकांचे दस्तावेज तपासणी करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर विद्युत सहायक पदासाठीच्या परीक्षांचा निकाल जाहीर करून भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ७००० जागांची भरती असल्याने फिजिकल डिस्टन्सिंग आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून ही पदभरती करण्यात यावी, असे निर्देश ऊजामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT