maharashtra gov sakal
अकोला

Akola News : महसूलला हवे मनुष्य‘बळ’; सुटता सुटेना रिक्त पदांचे ग्रहण

भौगोलिकदृष्ट्या मोठा व विकासापासून अद्याप लांब असलेल्या अकोला जिल्ह्यात सात तालुके व चार उपविभाग आहेत.

सुगत खाडे

अकोला - जिल्ह्यातील महसूल विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागल्यामुळे विभागाच्या कामाकाजाची वाट लागली आहे. त्यामुळे सामान्य जनतेची कामे प्रभावित होत आहेत. शिवाय विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून अनेकांना रात्री उशिरापर्यंत कामे करावी लागत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महसूल विभागाला शासनाकडून मनुष्य‘बळ’ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

भौगोलिकदृष्ट्या मोठा व विकासापासून अद्याप लांब असलेल्या अकोला जिल्ह्यात सात तालुके व चार उपविभाग आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्येक लहान मोठ्या कामांसाठी तहसिल कार्यालयासह महसूल विभागाच्या पायऱ्या झिंजवाव्या लागतात. रेशन कार्ड, जमीन नोंदणी, निराधार योजना, पिक नुकसान भरपाई, ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणूक व विविध परवानग्यांसाठी दररोज हजारो नागरिक व प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी महसूल विभागाच्या विविध कार्यालयाच्या चकरा मारतात.

परंतु कधी जनतेची कामे पूर्ण होतात तर कधी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे नागरिकांच्या कामाची वाट लागते. नागरिकांच्या दैनंदिन गरजा व लहान मोठ्या प्रमाणापत्रांसाठी महत्वाच्या असलेल्या या महसूल विभागात गत अनेक दिवसांपासून मनुष्यबळाचा आहे. परिणामी जनतेची कामे होण्यास विलंब होत असल्याचे वास्तव आहे.

दुसरीकडे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताणही पडत आहे. सध्या महसूल विभागात अधिकाऱ्यांची २२ तर कर्मचाऱ्यांची ७५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने महसूलमधील रिक्त पदांचे ग्रहण सोडवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांच्या खांद्यावर प्रभार

जिल्ह्याला नियमित निवासी उपजिल्हाधिकारी नसल्याने या पदाचा प्रभार रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. अकोला उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शरद जावडे यांच्याकडे भूसंपादन अधिकारी व केपीएमसीचा प्रभार देण्यात आला आहे.

पुनर्वसन विभागाचा प्रभार अनिल माचेवार, भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे असून संजय गांधी निराधार योजनेचे तहसिलदार अविनाश शिंगटे यांच्याकडे नझूल तहसिलदार व अधीक्षक पदाचा प्रभार आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी पदाचा प्रभार बार्शीटाकळीचे निरीक्षक आनंद गुप्ता यांच्याकडे आहे. त्यामुळे प्रभारींच्या खांद्यावर अनेक विभागांचा कारभार सुरू असल्याचे दिसून येते.

रिक्त पदांमुळे खोळंबा

- जिल्ह्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची १२ पद मंजूर आहेत. त्यापैकी नऊ पदी उपजिल्हाधिकारी कार्यरत असून तीन पदे रिक्त आहेत.

- तहसिलदारांचे १२ पद मंजूर असून नऊ तहसिलदार कार्यरत आहेत तर तीन पद रिक्त आहेत.

- नायब तहसिलदांचे ३८ पद मंजूर असून २२ नायब तहसिलदार कार्यरत आहेत, तर १६ पद रिक्त आहेत.

मंडळ अधिकाऱ्यांची ५४ पद मंजूर असून ५२ भरलेली आहेत तर दोन रिक्त आहेत.

- लघुटंकलेखकाची दोन पद मंजूर असून दोन्ही रिक्त आहेत.

- महसूल सहाय्यकाचे १४६ पद मंजूर असून १३१ पद भरलेले आहेत तर १५ पद रिक्त आहेत.

- चालकांच्या मंजूर १४ पदांपैकी केवळ नऊ चालकांची पदे भरलेली आहेत तर पाच रिक्त आहेत.

- निम्न श्रेणी लघुलेखकाचे सहा पद मंजूर असून पाच पद भरलेले आहेत, तर एक पद रिक्त आहे.

- उच्च श्रेणी लघुलेखकाचे एकच पद मंजूर असून ते रिक्त आहे.

- तलाठ्यांचे ३३० पद मंजूर असून २८१ भरलेले आहेत तर ५२ रिक्त आहेत.

पालकमंत्र्यांकडून अपेक्षा उंचावल्या

जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. संयमी व दुरदृष्टी नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात विविध विकास कामे व्हावी असे अपेक्षा व्यकत होत असतानाच महसूल मंत्रीच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने सामान्य नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे ते ‘महसूल’च्या रिक्त पदांचे ग्रहण सोडवतील, अशीही अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT