Akola News: Now go anywhere, Mumbai, Pune! Maharashtra, Vidarbha, Sevagram Express to start, reservation facility available from 15th October 
अकोला

आता मुंबई, पुणे कुठेही जा! महाराष्ट्र ,विदर्भ, सेवाग्राम एक्स्प्रेस होणार सुरू, आरक्षण सुविधा १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध

संजय सोनोने

शेगाव (जि. बुलडाणा)  ः कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे.अनलाॅक ५ मध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे.

त्यानुसार रेल्वे खात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या २० ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यात मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपाेवन एक्स्प्रेस, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उपयाेगी ठरणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी १५ ऑक्टोबरपासून आरक्षण करता येईल.


राज्यांतर्गत या गाड्या सुरू हाेणार

  • मुंबई-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस)
  • मुंबई-पुणे (इंटर सिटी)
  • मुंबई-पुणे (सिंहगड)
  • मुंबई-पुणे (प्रगती एक्स्प्रेस)
  • मुंबई-अमरावती एक्स्प्रेस
  • मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्स्प्रेस)
  • मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्स्प्रेस)
  • मुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्स्प्रेस)
  • मुंबई-काेल्हापूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस)
  • पुणे-सोलापूर (हुतात्मा एक्स्प्रेस)
  • पुणे-नागपूर सुपर फास्ट, पुणे-नागपूर (गरीबरथ एक्स्प्रेस)
  • पुणे-भुसावळ, काेल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस).


साप्ताहिक हावडा-मुंबई मेल व हावड-अहमदाबाद विशेष गाडी आता दररोज
रेल्वेप्रशासनातर्फे यात्री सुविधा साठी दोन गाड्यांच्या संचालनामध्ये वाढ करण्यात आली आहे. पहिले या दोन गाड्या त्रीसाप्ताहिकमध्ये चालवल्या जात होत्या, आता ते या दररोज धावणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT