मंगरुळपीर (जि.वाशीम) ः : येथील सुभाषराव ठाकरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी, ता.२६ सोयाबीनला चार हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. सोमवारी येथे हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर मार्केट यार्डपासून एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. आतापर्यंत ५६ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव रामकृष्ण पाटील यांनी दिली. वाशीम जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे पीक अधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतले आहे. अजूनही पीक येणे बाकी आहे. सोमवारी ता. २६ ला सोयाबीनची विक्रमी आवक झाली असून, यामध्ये वाशीम, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता. त्याचे कारण की येथे प्रतीक्विंटलला ४ हजार ते सरासरी ४ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. शेतकऱ्यांना नगदी देयक देण्यात आले. नेहमीच्या तुलनेत सध्या मंगरुळपीरमध्ये सोयाबीनची आवक जास्त झाली आहे. इतर बाजार समितीच्या तुलनेत मंगरुळपीर बाजार समितीत पारदर्शकता व जास्त भाव व नगदी पैसे मिळत असल्याने आम्ही आमचा माल या बाजार समितीत विकायला आणला असल्याचे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. (संपादन - विवेक मेतकर) |
|||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.