बार्शीटाकळी (जि.अकोला) : संताजी नगर तेलीपुरा भागातील रस्त्यावर असलेल्या ७० फुट खोल आणि तीन फुट अरुंद विहरीत पडलेल्या गाईला तीन तासाच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुखरुप बाहेर काढले. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने ही कामगिरी केली.
गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास विहिरीत गाय पडली होती. बार्शीटाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली.
विहीर सत्तर फुट खोल आणि तीन फुट रुंद असल्याने गाय काढणे अशक्य होते. दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी ऋषीकेश तायडे, अंकुश सदाफळे, मयुर सळेदार, सूरज ठाकूर, मयूर कळसकार, राहुल जवके, आशिष गुगळे यांनी गाईला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खाली पाणी आणि मिथेन गॅस असल्याने आतमध्ये जाणे अशक्य होते.
परंतु मोठ्या चिकाटीने व धाडसाने रेस्क्यू ऑपरेशन ऑपरेशन यशस्वी केले. जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी अरुंद विहरीतून गाईला कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास सुखरुप बाहेर काढले.
(संपादन - विवेक मेतकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.