अकोला : वारकऱ्यांना धार्मिक कार्य करण्याची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेसह वारकऱ्यांच्या इतर संघटनांनी केलेल्या उपोषणाचा मुद्दा विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. १४ डिसेंबर रोजी सुरू होत असलेल्या अधिवेशनात भाजप आमदार रणधीर सावरकर औचित्याच्या मुद्याद्वारे वारकऱ्यांच्या मागणीच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणणार आहेत. हे ही वाचा : शेतकरी आत्महत्येची १२ प्रकरणं अपात्र तर १३ पात्र ; ६ फेरचौकशीसाठी प्रलंबित या प्रकरणी प्रशासनातर्फे चर्चा केल्यानंतर सुद्धा तोडगा निघाला नाही. परिणामी अखेर ९ डिसेंबर राेजी शिवसेनेचे आमदार गाेपकिशन बाजाेरीया आणि भाजपचे आमदार रणधिर सावरकर यांच्याशी वारकऱ्यांनी मंडपात चर्चा केली. चार दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याची ग्वाही शिवसेना आमदारांनी दिली हाेती. त्यामुळे मुुख्य उपाेषणकर्ते हभप गणेश महाराज शेटे यांनी हे उपाेषण मागे घेतल्याचे जाहीर केले हाेते.
(संपादन - विवेक मेतकर) | |||
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.