Akola Main Market sakal
अकोला

Akola Curfew : अकोला जुने शहर, डाबकी रोड हद्दीत रात्रीची संचारबंदी

अकोला शहरातील चार पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत ता. १३ मेपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवारी दिलेत.

सकाळ वृत्तसेवा

अकोला शहरातील चार पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत ता. १३ मेपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवारी दिलेत.

अकोला - शहरातील चार पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत ता. १३ मेपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवारी दिलेत.

दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे तर दोन पोलिस स्टेशनच्या हद्दीत रात्रीची संचारबंदी कायम आहे. जमावबंदीचा आदेश मात्र कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सिटी कोतवाली व रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीत लावण्यात आलेली संचारबंदी निर्बंध हटविण्यात येऊन जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

shivsena Office bearer

जुने शहर व डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी शिथिल करून ता. १५ मेपासून सायं. ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ता. १५ मेचे रात्री ८ ते १६ मेचे सकाळी ८ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ता. १६ मेपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ८ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट; दोन दिवस व्यवसाय ठप्प

अकोला - जुने शहरात दोन समाजात झालेल्या वादानंतर शहरातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीत लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे मुख्य बाजार पेठेत साेमवारी शुकशुकाट दिसून आला.

रविवारी व साेमवार सलग दोन दिवस व्यवसाय ठप्प हाेते. त्यामुळे साेमवारी सकाळी जुने शहरासह मुख्य बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी लाेकप्रतिनिधी व प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर संध्याकाळी संचारबंदीमध्ये बदल करण्यात आल्याने व्यावसाियकांना दिलासा मिळाला. जुने शहर, डाबकी राेड पाेलिस स्टेशनच्या हद्दितील मेडिकल स्टाेअर्स वगळता अन्य दुकाने साेमवारी बंद हाेती. जीवनावश्यक वस्तूंसाठी अनेकांची पायपीट झाली.

mla randhir savarkar

सिटी काेतवाली व रामदास पेठ या दोन पाेलिस स्टेशनच्या हद्दित मुख्य बाजार पेठचा समावेश आहे. ता. १५ मे राेजी टिळक राेड, गांधी राेड, फतेहअली चाैक, माे. अली राेड, तेलीपुरा चाैक, सुभाष चाैक, दामले चाैक, दीपक चाैक या भागातील दुकाने बंद हाेती. टाॅवर चाैकात असलेल्या शास्त्री स्टेडीयमधील काही दुकाने सुरू हाेती. रेल्वे स्टेशन राेडवरील दाेन आणि दीपक चाैकातील एक पेट्राेल पंप साेमवारी दुपारी बंद हाेते. गांधी राेडवरील एक पंप सुरू हाेती. याठिकाणी वाहन चालकांनी गर्दी केली हाेती.

कोतवाली, रामदासपेठमधील संचारबंदी मागे

अकोला - सोशल मीडियावर व्हायलर झालेल्या एका संदेशावरून शनिवारी (ता.१३) रात्री जुने शहरातील हरीहरपेठ परिसरात दोन समाजात झालेल्या वादानंतर आता दोन दिवसांनी अकोला शहरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतील जात आहे. दरम्यान, शनिवारी रात्री घडलेल्या घटनेस जबाबदार असणाऱ्या ३०० पेक्षा अधिक नागरिकांवर जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये चार गुन्हे व रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल केले असून, सोमवारी सायंकाळपर्यंत १०१ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयातही हजर करण्यात आले.

संचारबंदीतही सोमवारी शिथिलता देण्यात आली. अकोला शहरात जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी रात्री दोन समाजात वाद झाले. दगफेक व जाळपोळीत एकाच मृत्यू झाला होता तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. सात ते आठ घरांची जाळपोळ करण्यात आली. अनेक गाड्या पेटवून देण्यात आल्यात. थरकाप उडविणाऱ्या या घटनेत पोलिसांचे अपयश अधोरेखीत झाले. रात्री २.३० वाजतानंतर पोलिसंना हल्लेखोरांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर तातडीने अकोला शहरातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीत कलम १४४ नुसार जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. सोबतच संचारबंदीही लावण्यात आली होती. संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे.

मयत विलास गायकवाडच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली

अकोला - जुने शहरातील हरीहर पेठ परिसरात दोन समाजामध्ये झालेल्या वादात ठार झालेले विलास गायकवाड यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) स्वीकारली आहे.

मृतक गायकवाड यांच्या कुटुंबियांची ठाकरे गटाच्या आमदार व पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून त्यांच् सांत्वन केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने गायकवाड कुटुंबियांना रोख एक लाखाची मदत देण्यात आली. सोबतच मयताच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली. यावेळी माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे, उपजिल्हा प्रमुख मंगेश काळे, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, नितिन ताकवाले, योगेश गिते, नितीन मिश्रा, अनिल परचुरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे धनादेश

अकोला - समाजकंटकांच्या हल्ल्यात ठार झालेले जुने शहरातील विलास गायकवाड यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने चार लाख रुपये व भाजपतर्फे एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सोमवारी सोपविण्यात आला. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते हे धनादेश सोपविण्यात आले. गायकवाड परीवारीतील पाल्यांना आमदार वसंत खंडेलवाल यांचे वतीने शैक्षणिक खर्च दिला जाणार असल्याची घोषणा यावेळी केली.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, भाजप महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, माधव मानकर, वसंत बाछुका, जयंत मसने, शिवसेनेचे मुरलीधर सटवाले, अमोल गोगे, संतोष पांडे, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, संजय गोटफोडे, अमोल गीते आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची दाखल घेऊन तातडीने शासनाकडून आपतकालीन मदतीचा धनादेश मयताच्या कुटुंबियांना सोपविल्याची माहिती आमदार सावरकर यांनी दिली. यावेळी शासनातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सुनील पाटील, कदम, नंदकिशोर माहोरे व जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT