Akola sakal
अकोला

Akola : दुरुस्तीची संधी, मतदारयादीत नाव नोंदणी; मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

कार्यक्रमात मतदारांनी नावे नोंदविणे, वगळणे, केंद्र बदल इत्यादी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन करता येतील अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येतील. या कार्यक्रमात राजकीय पक्षांनी मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविणे

सकाळ वृत्तसेवा

Akola - भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कार्यक्रमात मतदारांनी नावे नोंदविणे, वगळणे, केंद्र बदल इत्यादी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे देऊन करता येतील अथवा ऑनलाईन पद्धतीने करता येतील. या कार्यक्रमात राजकीय पक्षांनी मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविणे, वगळणे, छायाचित्र अपडेट करणे इत्यादी अद्यावतीकरणाबाबत मतदारांना आवाहन करुन जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत सोमवारी (ता. १९) उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय अधिकारी शरद जावळे,

सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष शिंदे, नायब तहसिलदार अतुल सोनोने तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मनोज पाटील, रमेश इंगळे, विजय येलकर, आनंद वानखडे, रविंद्र तायडे, अजबराव ताले आदी उपस्थित होते. यावेळी महेश परंडेकर यांनी उपस्थितांना मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

नवीन यंत्रे मिळाली, तपासणी लवकरच

निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यात नवी मतदार यंत्रे प्राप्त झाली आहेत. त्यांची प्रथमस्तरीय तपासणी ४ जुलै पासून एम.आय.डी.सी. शिवणी फेज ४ वखार महामंडळ गोदाम क्र. ६ अकोला येथे सुरु होणार आहे. जिल्ह्यात नव्याने एम-३ प्रकारची मतदान यंत्रे दाखल झाली आहेत.

असा आहे मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम

२१ जुलै ते २१ ऑगस्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी, पडताळणी. २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण व प्रमाणीकरण, मतदान यादी, मतदान ओळखपत्रातील त्रुटींची दुरुस्ती करणे,

त्यांना मान्यता प्राप्त करुन घेणे, नियंत्रण तक्ता अद्यावत करणे, ३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर नमुना एक ते आठ तयार करणे, १ एप्रिल २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पूरक व एकात्मिक प्रारुप मतदार यादी तयार करणे, १७ ऑक्टोबर एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दावे हरकती स्वीकारण्याचा कालावधी.

नाव नोंदणी, दुरुस्तीसाठी कोणता अर्ज भराल?

मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे, वगळे, छायाचित्रात दुरुस्ती करणे ,सुधारणा करण्यासाठी खालील प्रमाणे नमुना अर्ज भरावयाचा आहे.

मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना सहा.

मतदार यादीतून समाविष्ट असलेले नाव वगळणी करण्याकरीता नमुना सात.

नाव तसेच अन्य तपशिल (उदा. पत्ता वगैरे) व छायाचित्रात दुरुस्ती करण्यासाठी नमुना आठ.

मतदार ओळखपत्र बदलासाठी नमुना ००१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Atul Bhatkhalkar Won Kandivali East Assembly Election : कांदिवली पूर्व विधानसभेत बीजेपीच्या अतुल भातखळकरांची विजयी हॅट्रिक !

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

SCROLL FOR NEXT