Akola  Sakal
अकोला

Akola : नाल्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीस सुखरुप वाचविले; पिंजर येथील रेस्क्यू ऑपरेशन टीमचं होतंय कौतुक

सतत पाऊस सुरु आहे यामुळे पुर परीस्थीती निर्माण झाली

सकाळ वृत्तसेवा

Akola - पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची धाडसी कामगीरी अकोला जिल्हाधिकारी मा. निमा अरोरा मॅडम मा.नि.उप-जि.अ. डाॅ.शरद जावळे सर यांच्या आदेशानुसार अकोला तालुक्यात सतत पाऊस सुरु आहे.

यामुळे पुर परीस्थीती निर्माण झाली होती संभाव्य धोके लक्षात घेता आज पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम अंकुश सदाफळे,ऋषिकेश राखोंडे,महेश साबळे,निलेश खंडारे,

शेखर केवट,किशोर तायडे,विकास सदांशिव, हे रेस्क्यु बोट आणी शोध व बचाव साहीत्यासह आज दीवसभर अकोला शहरासह तालुक्यात सज्ज होते आज दुपारी अकोला नविन कीराणा मार्केट मध्ये पाणी घुसलेले होते या करिता रेस्क्यु टीम अकोला तहसीलदार सुनील पाटील सर यांच्या सोबत सज्ज होती.

याच वेळी बाजुला शिवसेना वसाहतीत आलेल्या नाल्याच्या पुरात एक जण वाहून जात असतांना येथील नागरिकांनी पाहीले आणी आरडाओरडा केली तेव्हा बाजुलाच कीराणा मार्केट मध्ये पिंजर ची रेस्क्यु टीम काम करत होती तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तहसीलदार सुनील पाटील यांनी टीम ला नाल्या कडे पाठविले'.

क्षणाचाही विलंब न करता स्विमर अंकुश सदाफळे, किशोर तायडे,शेखर केवट,विकास सदांशिव यांनी उड्या घेतल्या आणी त्या वाहत जात असलेल्या ईसमाला धरले आणी सुखरूप बाहेर काढले यावेळी हे ईसम शिवसेना वसाहतीतील रहिवासी संतोष बांगर वय अंदाजे (60) वर्ष असल्याची माहिती झाली उपस्थित नागरिकांनी आपात्कालीन पथकाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT