akola rain farmer got affected in farming monsoon weather forecast Sakal
अकोला

Akola Rain News : दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर कायम; उशिरा पेरण्या झालेल्या शेतांमध्ये डवरणे, फवारण्या रखडल्या

सकाळ वृत्तसेवा

Akola News : जुनच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले तर, रखडलेल्या पेरण्याही आटोपल्या. शिवाय पावसाने थोडी उसंत दिल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी डवरणे, फवारण्या सुरू केल्या.

मात्र, जवळपास १५ जुलैपासून पुन्हा पावसाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने उशिरा पेरण्या झालेल्या शेतांमध्ये डवरणे, फवारण्या रखडल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यासह राज्यभरात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र, मॉन्सूनचे आगमन अपेक्षित वेळेत व अपेक्षित पाऊस जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात न झाल्याने खरीप पेरण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

मात्र, तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावत सरासरी गाठल्याने जुनच्या अखेरपर्यंत बहुतांश भागात खरीप पेरण्या आटोपल्या. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कपाशी पिकाची चांगली पेरणी झाली व जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अपेक्षित पाऊस पडल्याने पिके सुद्धा चांगली बहरली.

शिवाय जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने थोडी उसंत देताच बहुतांश शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणी व डवरणी आटोपण्यावर भर दिला. मात्र, जुलैच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावत आजपर्यंत रिपरिप सुरू ठेवली. त्यामुळे उशिरा पेरणी झालेल्या व सुरुवातीच्याही पेरणी झालेल्या काही शेतांमध्ये डवरणी, फवारणी करण्याची संधी शेतकऱ्यांना प्राप्त होऊ शकली नसून, पावसाच्या उसंतीची बहुतांश शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.

जलप्रकल्पही प्रगतीवर

जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये उन्हाळ्यात पाणी पातळी चांगलीच खालावली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने या प्रकल्यांची स्थिती सुद्धा आता सुधारली आहे. त्यामध्ये काटेपूर्णा प्रकल्प ४१.९० टक्के, वान प्रकल्प २८.८४ टक्के, मोर्णा प्रकल्प ५३.७५ टक्के, निर्गुणा प्रकल्प ५३.९० टक्के, उमा प्रकल्प १९.४२ टक्के, दगडपारवा प्रकल्प ५९.४७ टक्के भरला आहे.

२८ जुलैपर्यंतचा पाऊस

तालुका - पाऊस (मिमी)

  • अकोट - ४३२.९

  • तेल्हारा - ३२६.९

  • बाळापूर - ४०७.३

  • पातूर -४५७.१

  • अकोला - ४२६.९

  • बार्शीटाकळी - ४१२.०

  • मूर्तिजापूर - ३५२.०

  • एकूण - ४०३.१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT