Akola esakal
अकोला

Akola : सर्वसाधारण सभेत माईकची तोडफोड; खुर्ची फेकली

पेट्रोल पंपाला जागा देण्यावरून जुंपली; शिवसेना सदस्य आक्रमक

Anuradha Vipat

अकोला : जि.प.च्या मालकीच्या खुल्या जागा भारत पेट्रोल पंप व हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडला भाडेतत्वावर देण्याच्या ठरावावरुन सत्ताधारी वंचित व विरोधक शिवसेना ठाकरे गटांच्या सदस्यांमध्ये मंगळवारी (ता. १९) सर्वसाधारण सभेत जुंपली.

शिवसेना सदस्यांनी जागा देण्याचा विरोध केला. दोन्ही पक्षाच्या सदस्यांमध्ये या मुद्द्यावर खडाजंगी सुरु असतानाच अध्यक्ष संगीता अढाऊ यांनी ठराव मंजूर केला. याव्यतिरिक्त अध्यक्षांकडील दोन खाते सभापतींना देण्यात विलंब झाल्यामुळे सभेत शिवसेना सदस्य डॉ. प्रशांत अढावू सभागृहात खुर्ची फेकली. त्यासोबतच अकोट येथील रुग्णालयाच्या जागेसंदर्भात न्यायालयात वकील नेमण्यास हलगर्जी होत असल्याने होत असल्याने डॉ. अढाऊ यांनी माईकची तोडफोड केली.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मंगळवारी (ता. १९) सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षांच्या परवानगीने विषय सुचिवरील विषयांवर चर्चा सुरु करण्यात आली. त्यामध्ये भारत पेट्रोल पंपासाठी जि.प. सिव्हील लाईन पोलिस स्टेशन चौकातील आकाशवाणी जवळील जागा व अग्रसेन चौकातील जागा भाडेतत्वावर देण्याचा आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेडला रिटेल आऊटलेटसाठी सिव्हील लाईन चौक, सावित्रीबाई फुले शाळा स्टेशन रोड व डाबकी रोड येथील प्रत्येकी ९०० स्केअर मीटरची जागा भाडेतत्वावर देण्याचा ठराव सभागृहात मांडण्यात आला.

सत्ताधारी-अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

जिल्हा परिषदेच्या जागा भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा न बोलवता व स्पर्धा न घेता जागा भाडेतत्वावर देण्याचा शिवसेना सदस्य गोपाल दातकर व डॉ. प्रशांत अढाऊ यांनी विरोध केला. सदर जागेपैकी एका ठिकाणी शाळा तर दुसऱ्या ठिकाणी मंगल कार्यालय असल्याने जागा पेट्रोल पंपाला देता येऊ शकत नाहीत, असा मुद्दा शिवसेना सदस्य गोपाल दातकर यांनी उपस्थित केला. जागा भाड्याने देण्यापूर्वी त्यापासून जिल्हा परिषदेला किती उत्पन्न मिळेल याचे मूल्यांकण करण्यात आले का? जागा भाड्यावर देण्यासाठी शिक्षण विभाग, पंचायत विभागांची परवानगी घेण्यात आली आहे का? मालमत्ता अधिकाऱ्यांनी याबाबत टिप्पणी दिली का? अशा प्रश्नांचा भडिमार शिवसेना सदस्यांनी सत्ताधारी वंचितचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने व अधिकाऱ्यांवर केला. शेवटी शासनाची परवानगी मिळाल्यानंतरच जागा भाडेतत्वावर देण्यात येईल, या अटीवर विषय मंजूर करण्यात आला.

इतर मुद्द्यांवर वादळी चर्चा

वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरूस्ती होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, असा मुद्दा वंचितचे राम गव्हाणकर व कॉंग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर यांनी मांडला. त्यावर सत्ताधारी गटाचे ज्ञानेश्वर सुलताने यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता आरोग्याचा मुद्दा असल्याने या विषयाला फाटा फोडू नका, अधिकाऱ्यांना वाचवू नका, असे वंचितचे सदस्य राम गव्हाणकर स्वपक्षाच्या गटनेत्यांना म्हणाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये बेबनाव असल्याचे दिसून आले. सभेत जिल्हा परिषद अध्यक्षांकडील बांधकाम व आरोग्य खात्याचे वाटप करण्यात आले. बांधकाम विभाग उपाध्यक्ष सुनील फाटकर तर आरोग्य खाते शिक्षण समिती सभापती माया नाईक यांच्याकडे सोपवण्यात आले.

अकोट येथील जिल्हा परिषदेच्या मालकीची ०.१२ एकर गुंठे इमारत व खुल्या जागेसह श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यास भाडेपट्‍ट्‍यावर व नवीन बांधकामास देण्यास शिवसेना सदस्यांनी विरोध केला. अकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार काढण्यात यावा असा मुद्दा सदस्य स्फूर्ती गावंडे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT