अकोला : क्रांतिदर्शी युगपुरूष वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समग्र साहित्य शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याच्या शुद्ध हेतूने गेले नऊ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ता. २० व २१ जानेवारी रोजी जानोरकर मंगल कार्यालय रिंग रोड अकोला येथे हे संमेलन होईल. (Akola News)
या संमेलनाची चर्चा विदर्भासह राज्यभरात होऊ लागल्याने दर्जासुध्दा वाढत आहे. हे संमेलन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या गुणात्मक प्रचाराच्या दृष्टीने शिस्तबद्ध व चाकोरीबद्ध होण्यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग प्रामुख्याने नोंदवला जात असतो. संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष, समारोपीय कार्यक्रमाचे पाहुणे, विविध परिसंवादाचे विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी, समीक्षक, व्याख्याते, प्रवक्ते, पत्रकार, राष्ट्रीय कीर्तनकार, गायक, गझलकार सामूदायिक ध्यान, प्रार्थना साधक इत्यादी मान्यवरांच्या भरगच्च उपस्थिती लाभेल.
तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विज्ञानवादी व परिवर्तनशील विचारांनी हे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. त्याकरिता अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यातील श्रीगुरुदेव प्रेमींनी सहकार्य व सेवेकरिता आपापले नावे आयोजन समितीकडे नोंदवावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.