रविकांत तुपकर व राजू शेट्टी sakal
अकोला

बुलडाणा : ‘महाआघाडी’तून स्वाभिमानी बाहेर पडण्याच्या मार्गावर!

राजू शेट्टी बुलडाण्यात आले असता त्यांच्याशी झालेल्या चर्चेत ते महाआघाडी सरकारवर नाराज असल्याचे दिसून आले होते.

अरुण जैन

बुलडाणा : शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसतील आणि अतिवृष्टी सारख्या अडचणीच्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकारही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार असेल, तर या आघाडी सरकारमध्ये नावापुरते राहून उपयोग काय? अशा मानसिकतेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आली असल्याने त्यांचा आघाडीसोबत काडीमोड होण्याची औपचारिकता बाकी असल्याचे दिसून येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी व पक्षाचे विदर्भाचे नेते रविकांत तुपकर यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा करून अतिवृष्टीची पाहणी केली. ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवाय जयसिंगपूर मध्ये ऊस परिषद देखील घेतली. या पूर्ण दौऱ्यात शेट्टी व तुपकर शासनावर टीका करताना दिसून आले. ऊस परिषदेत तर शेट्टींनी सरकारला निर्वाणीचा इशारा देखील दिला. त्यामुळे स्वाभिमानीने सरकारमधून बाहेर पडण्याची मानसिकता केली असल्याचे दिसून येत आहे.

राजू शेट्टी बुलडाण्यात आले असता त्यांच्याशी झालेल्या चर्चेत ते महाआघाडी सरकारवर नाराज असल्याचे दिसून आले होते. त्यावेळी ते म्हणाले, की शिवसेनेचे मुख्यमंत्री असले तरी खऱ्या अर्थाने सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच चालवित आहे. काँग्रेस मात्र नाईलाज म्हणून त्यांच्यासोबत फरपटत जात आहे. या भूमिकेवरून त्यांची मानसिकता आघाडी सरकारसोबत राहण्याची नाही. हे निश्चितच कळून येते. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना एखाद्या पदासाठी, महामंडळासाठी किंवा कोणत्या लाभासाठी सरकारसोबत फरपटत जाणे कधीही मान्य करणार नाही. त्यामुळे काडीमोड मानसिकदृष्ट्या झालेलाच आहे. त्याची केवळ औपचारिकता बाकी आहे...!

सरकारला जड जाईल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे केवळ एक आमदार आहे. त्यांच्या बाहेर पडल्याने राज्य सरकारला फरक पडणार नसला तरी विरोधकांच्या सोबतीने स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्यास त्यांना आवरणे सरकारला अवघड जाणार आहे. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे स्वतंत्र अस्तित्व उभे करणे किंवा भाजपच्या साथीने सरकारला जेरीस आणणे असे दोन पर्याय उपलब्ध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT