Teacher sakal
अकोला

Akola : विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवणारे बहुतांश शिक्षकच व्यसनाधीन!

तेल्हारा पंचायत समितीमधील चित्र

धर्मेश चौधरी

तेल्हारा : शिक्षकाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा आदरयुक्त असतो नवीन पिढी घडविण्याची मोलाची जवाबदारी शिक्षक पार पाडत असतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार व जीवन जगण्याची दिशा देण्याचे काम शिक्षकाचे आहे. परंतु तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत अनेक शिक्षक स्वतःच व्यसनाधीन होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात मराठी व उर्दू माध्यम मिळून प्राथमिक व माध्यमिक अश्या एकूण १०१ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तर यामध्ये ५२३ शिक्षक शिक्षिका कार्यरत आहेत. तालुक्यातील गर्भश्रीमंत असणाऱ्याची मुले खाजगी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात तर खाजगी शाळांची भरमसाठ असणारी फी आवाक्याबाहेर असल्याने गोरगरिबांची मुले जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाचे धडे घेण्यासाठी जातात.

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासारख्या पवित्र कामाची जबाबदारी असणारे अनेक शिक्षक व्यसनाधीन असल्याचे चित्र हल्ली पहावयास मिळत आहे. यामध्ये अनेक शिक्षक पान, विडी, सिगारेटचे झुरके मारताना तर काही महाभाग तंबाखू, गुटखा आदींचे व्यसन खुल्लेआम पान टपरी वर उभे राहून करतांना दिसतात तर कित्येक शिक्षक चक्क बार मध्ये जाऊन मद्यपान करतांना पहावयास मिळत आहेत अनेक शिक्षकांना जुगाराच्या व्यसनाने जडले असून, अनेक झण बावनपत्ती जुगार खेळण्यात मग्न असतात.

काही शिक्षक चक्क वरळी मटका जुगाराचे आकडे लावतांना दिसतात. यापूर्वी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक शिक्षकाला जुगार खेळतांना पकडले होते; परंतु पोलिसांच्या पायपोटी लागून व नोकरी जाणार असल्याचे दाखवून या शिक्षकाने कशीबशी स्वताची सुटका करून घेतली होती. हे चर्चेतून ऐकावयास मिळाले होते. कार्यालयीन वेळेत शाळेला दांड्या मारून व्यसन पूर्ण करणाऱ्या शिक्षकाकडे केंद्रप्रमुखाकडून सुध्दा डोळेझाक केली जात आहे तर खुद्द शिक्षणाधिकारी हे प्रभारी असल्याने मुख्यालयी राहत नाहीत.

त्यामुळे शिक्षकांवर त्यांचा अजिबात नियंत्रण नसल्याचे पहावयास मिळत आहे. शिक्षादाना सारखी पवित्र व नवीन पिढी घडविण्याची महत्वपूर्ण जवाबदारी असलेले शिक्षकच जर व्यसनाधीन होत असतील तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचे काय हा प्रश्न या मुळे उपस्थित होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. गट शिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT