Akola two lakh quintal gram seed distribution 
अकोला

Akola : सव्वा दोन लाख क्विंटल हरभरा बियाणे

महाबीजचे नियोजन; बियाणे उपलब्ध, कृषीच्या परमीट उपलब्धतेनंतर वाटप

सकाळ वृत्तसेवा

महाबीजचे नियोजन; बियाणे उपलब्ध, कृषीच्या परमीट उपलब्धतेनंतर वाटप

अकोला : येणाऱ्या रब्बीसाठी महाबीजकडून सव्वा दोन लाख क्विंटल हरभरा बियाण्याची उपलब्धता करण्यात आली असून, तत्पूर्वी १.७२ लाख क्विंटल हरबरा तर, ३३ हजार क्विंटल गहू बियाण्याच्या वाटपाचे लक्षांक निर्धारित करण्यात आले होते.

विदर्भात रब्बीमध्ये हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी होते. त्यामुळे बियाणे उत्पादक संस्था, कंपन्यांकडून हंगामापूर्वी पेरणीक्षेत्र व शेतकरी संख्या यावर आधारित हरभरा बियाणे वाटपाचे लक्षांक निर्धारित केले जाते. यावर्षी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने सुद्धा राज्यात १० वर्षाआतील हरभरा वाणाच्या ६१ हजार ५०० क्विंटल तर, १० वर्षावरिल वाणाच्या एक लाख ११ हजार ५४ क्विंटल, असे एकूण एक लाख ७२ हजार ५५४ क्विंटल हरभरा बियाणे वाटपाचे लक्षांक निर्धारित केले होते.

मात्र, यावर्षी रब्बीसाठी पोषक ओल व हवामानाचा अंदाज लक्षात घेता लक्षांकापेक्षा अधिक बियाणे पुरवठा करत महाबीजकडून दोन लाख २८ हजार क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध करून दिले आहे.

त्यामध्ये १० वर्षाआतील वाणाचे एक लाख १७ हजार क्विंटल तर, १० वर्षावरिल वाणाचे एक लाख ११ हजार क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध करण्यात आले असून, कृषी विभागाचे परमीट आल्यानंतर या बियाण्याचे वाटप सुरू होणार असल्याची माहिती महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक संतोष आळसे यांनी सांगितले.

३३ हजार क्विंटल गव्हाच्या बियाण्याचे नियोजन

रब्बीकरिता महाबीजने १० वर्षाआतील डीबीडब्ल्यू-१६८, पीडीकेव्ही सरदार, फुले समाधान, एमएसीएस-६४७८, यूएएस-४२८ या वाणाच्या ५३५७ क्विंटल तर, १० वर्षावरील एनआयएडब्ल्यू-१४१५, लोक-१, एमएसीएस-६२२२, एचआय-१५४४, जीडब्ल्यू-४९६, आचआय-८६६३ या वाणाचे २७ हजा ६४३ क्विंटल असे एकूण ३३ हजार क्विंटल गव्हाच्या बियाण्याचे सुद्धा नियोजन केले आहे.

१० वर्षातील वाण, दर व अनुदान

यावर्षी महाबीजकडून राजविजय-२०२, फुले विक्रम, फुले विक्रांत, एकेजी ११०९ (पीडीकेव्ही कांचन), बीजी-३०-६२ (पुसा पार्वती), बीजीएम-१०२१६ या १० वर्षाआतील वाणांच्या बियाण्याचा प्रतिएक्कर १४०० रुपये (२० किलोची बॅग) दर निर्धारित करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रतिएक्कर ५०० अनुदान देत, ९०० रुपये अनुदानित विक्री किमत राहणार आहे.

बिडिएनजीके-७९८ या पाच किलो पॅकिंगच्या बियाण्यासाठी वितरणाकरिता एकरी ३० किलो बियाण्याचा ३३०० रुपये निर्धारित करण्यात आला असून, त्यामध्ये प्रतिएक्कर ७५० अनुदान देत, २५५० रुपये अनुदानित विक्री किमत राहणार आहे.

१० वर्षावरील वाण, दर व अनुदान

दिग्विजय, जॅकी ९२१८, विजय, विशाल, कृपा, विराट या १० वर्षावरिल वाणाची उपलब्धता महाबीजकडून करण्यात आली आहे. त्यापैकी दिग्विजय (एकरी ३० किलो) वितरणाकरिता २१६० रुपये दर असून, ६०० रुपये अनुदानासह शेतकऱ्यांना १५६० रुपयांना मिळणार आहे. जॅकी ९२१८ वाणाचा (एकरी २० किलो) वितरणाकरिता १४२० रुपये दर असून, ४०० रुपये अनुदानासह १०२० रुपयांना मिळणार आहे.

विजय वाणाचा (एकरी ३० किलो) वितरणाकरिता २१०० रुपये दर असून, ६०० रुपये अनुदानासह ११५०० रुपयांना मिळणार आहे. विशाल वाणाचा (एकरी २० किलो) वितरणाकरिता १४८० रुपये दर असून, ४०० रुपये अनुदानासह १०४० रुपयांना मिळणार आहे. कृपा, विराट वाणाचा (एकरी ३० किलो) वितरणाकरिता ३३०० रुपये दर असून, ६०० रुपये अनुदानासह २७०० रुपये दराने मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT