Akola Violence sakal
अकोला

Akola Violence : धार्मिक आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल झाल्याने वाद, समाजकंटकांची धरपकड; पोलिसांकडून हवेत गोळीबार

परिस्थिती नियंत्रणात; धार्मिक आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल झाल्याने वाद; तणावपूर्ण शांतता

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जुने शहरात दाेन गटांमध्ये शनिवारी रात्री दंगल उसळल्यानंतर पाेलिसांनी रविवारी सकाळी घटनेस जबाबदार असलेल्या समाजकंटकांचे अटकसत्र सुरू केले. दंगलीत रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. धार्मिक-प्रार्थनास्थळांंवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुरांचा वापर करावा लागला.

या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी आहेत. यात दोन पोलिसांचाही समावेश आहे. जुने पोलिस स्टेशनच्या महिला हवालदार शैला खंडारे या गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजणक आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी प्राथमिक माहितीनुसार २५ जणांना ताब्यात घेण्यात होते.

रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक आक्षेपार्य धार्मिक पाेस्ट समाजमाध्यमांवर व्हायलर झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्याचे पर्यावसन काही वेळाने जुने शहरातील हरिहर पेठ, पोळा चौक, गाडगे नगर, जय हिंद चौक या भागात दगफेक व जाळपोळीत झाले.

एक गट मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. समाजकंटांनी दिसेल त्याला लक्ष्य करीत दुचाकी आणि ऑटोरिक्षांचे प्रचंड नुकसान केले. दंगलची तीव्रता लक्षात घेता पोलिस अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील पोलिस स्टेशनमधिल पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यानंतर जुने शहरात नाकेबंदी करण्यात आली.

महिला पोलिस कर्मचारी गंभीर

जुने शहरात शनिवारी झालेल्या दंगलीमध्ये दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष्य केलेत. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झालेत. जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यकर महिला हवालदार शैला खंडारे या दंगलीमध्ये गंभीर जखमी झाल्यात. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बाजारपेठेत शुकशुकाट

रविवार हा बाजाराचा दिवस. त्यामुळे मुख्य बाजार रविवारी गजबजलेला असतो. मात्र, शहरात घडलेल्या दंगलीमुळे रविवारी संपूर्ण बाजारपेठ बंद होती. त्यामुळे रविवार असूनही बाजारात शुकशुकाट होता. भाजीबाजार, कापड बाजार, दानाबाजारासह संपूर्ण बाजारपेठ रविवारी दिवसभर बंद ठेवण्यात आली.

मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

जुने शहरात शनिवारी झालेल्या दगडफेकीत जुने शहरातील हातमजुरी करणारे विलास गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्याचा मृत्यी झाला. त्यांच्या कुटुंबियांना भाजपतर्फे आर्थिक मदत देत एक लाख रुपये देण्याची घोषणा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर त्यांनी केली. श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने ५१ हजार रुपयाची तातडीची मदत आमदार आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली.

या भागात केली नाकाबंदी

जुने शहरातील अनेक भागात तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. डाबकी राेड, वीर हनुमान चाैक, जयहिंद चाैक, गाडगेनगर, भांडपुरा या भागात पाेलिसांनी नाकाबंदी केली आहे. याशिवाय जुने शहराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील माेठा पूल, महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली), टिळक राेड, कापड बाजर, ताजनापेठ, फतेह अली चाैकात बॅरीगेट्स लावून नाकाबंदी करण्यात आली.

अफवांवर विश्वस ठेवू नका : पोलिस अधीक्षक

दाेन गटात वाद झाल्याने दंगसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. पाेलिसांनी तातडीने कारवाई करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, समाजकंटकांना अटक केली आहे. पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काेणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.

दंगलग्रस्त प्रभावित क्षेत्रात पोलिस बंदोबस्त

दंगलखाेरांनी शनिवारी रात्री जयहिंद चाैक, राजेश्वर मंदिर जवळ, छत्रपती शिवाजी नगर, अक्कलकाेट, गाडगे नगर या भागात दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. कार पेटवून देण्यात आली. धार्मिक-प्रार्थनास्थळांना लक्ष्य करीत थेट आत घुसत समाजकंटकांनी साहित्याची जाळपाेळ केली. या भागातील आठ दुचाकी, ट्रॅक्टर जाळण्यात आल्या. तीन कारवर दगडफेड करीत प्रचंड नुकसान करण्यात आले. दंगलखाेरांना शांत करण्यासाठी स्थानिक पाेलिसांसोबत अमरावती येथील राज्य राखीव पाेलिस दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक पाेलिसही बंदुकांसह दंगलग्रस्त भागात तैनात करण्यात आले.

जुने शहरात समाजकंटकांनी दगडफेक करीत गाड्यांच्या काचा फोडल्या. वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर अग्निशमन दलाने रस्त्याची स्वच्छता केली. मंत्री गरीष महाजन यांनी रविवारी अकोला येथे भेट देत दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर व भाजपचे पदाधिकारी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT