akola washim news Farmers line up again for urea, artificial scarcity in front of traders; The Department of Agriculture claims that stocks are abundant 
अकोला

अरे हे काय? चक्क युरीयालाच फुटले पाय अन् कृषी विभाग म्हणतोय...

राम चौधरी

वाशीम ः आधीच पीक कर्जाचा तिढा त्यात लवकर झालेले मॉन्सूनचे आगमन, त्यामुळे सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्याला आता कृषी निविष्ठा विकणाऱ्या दुकानदारांनी वेठीस धरले आहे.

जिल्ह्यामध्ये युरियाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात असला तरी, जिल्ह्यामध्ये युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांसमोर सात वर्षानंतर पुन्हा रांगेत लागण्याची वेळ आली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. त्यात केवळ ३० टक्के शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप झाल्याने ७० टक्के शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले. जिवापाड जपलेले पीक ऐन भरात असताना आता या पिकांना युरियाची नितांत गरज आहे.

ही शेतकऱ्यांची निकड लक्षात घेवून जिल्ह्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी युरियाचा काळा बाजार करणे सुरू केले आहे. प्रत्येक पोत्यावर २५ ते ३० रूपये जादा शुल्क देवूनही शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्या दुकानदाराकडे युरिया उपलब्ध आहे. त्याच्या दुकानासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. ठराविक शेतकऱ्यांना युरिया दिल्यानंतर दुकानदार युरिया संपल्याचे सांगत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज युरियासाठी पायपीट करावी लागते.

संचारबंदीचाही कोंडमारा
युरिया विकत घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर सकाळी सही वाजतापासूनच शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. मात्र वाशीम, मालेगाव, कारंजा व मानोरा या शहरात दुपारी २ वाजतानंतर संचारबंदी लागते तर, मंगरूळपीर व रिसोड या दोन शहरामध्ये २४ तास संचारबंदी आहे. २ वाजतानंतर युरिया नेण्याकरीता कोणतेही वाहन उपलब्ध राहत नाही. याबाबीचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसणार आहे.

जिल्ह्यामध्ये नियमीत नियतनानुसार सध्या तीन हजार १०९ मेट्रीक टन युरिया उपलब्ध आहे. जिल्ह्यामध्ये युरियाची टंचाई निर्माण होणे शक्य नाही. तरीही काही दुकानदार साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात आमचे फिरते पथक लक्ष ठेवणार आहे.
- विकास बंडगर, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.वाशीम

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT