akola water storage rise 31 percent due to rainfall weather forecast  Sakal
अकोला

Akola Rain Update : अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठा वाढला; नागरिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Akola News : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या ३१.३३ टक्के पाणी जमा झाले आहे.

त्यामुळे अकोला शहर वासियांची पाणी टंचाईची अडचण काही प्रमाणात दूर झाली आहे. याव्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्येही पाणी जमा झाल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात यंदा मृग नत्राच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता घटल्याचे दिसून आले. ७ जून रोजी अकोला शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. ग्रामीण भागातही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला व ४५ डिग्रीपर्यंत गेलेल्या तापमानात घट झाली.

पावसाच्या आगमनाने नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला परंतु गर्मीपासून मात्र नागरिकांची सुटका झाली नाही. त्यानंतर १४ ते १५ जूनपर्यंत सुद्धा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा मॉन्सूनचे वेळेत आगमन झाल्याने शेतकरी व नागरिक उत्साहित झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. उन्हामुळे पारा सुद्धा वाढला.

पावसाने अचानक हुलकावणी दिल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे २४ जून रोजी जिल्ह्यातील सर्व मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात मिळूण केवळ २२.९४ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

पावसाळा लाबंल्यास नागरिकांसमोरील जलसंकट तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच गत आठवड्यात जिल्ह्यात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात पाणी जमा झाले.

३३१.८ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा घटत होता. परंतु आता काही प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान जिल्ह्यात २१ जुलै पर्यंत सरासरी ३३१.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे.

त्यानुसार अकोट तालुक्यात ३५७.५, तेल्हारा २७२.४, बाळापूर ३४०.७, पातूर ३७४.१, अकोला ३६४.५, बार्शीटाकळी ३२८.२, मूर्तिजापूरमध्ये २७२.१ मिमी पाऊस झाला.

भूजल पातळीही वाढली

एप्रिल, मे महिन्यात जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. त्यासोबतच पाणी टंंचाईला सुद्धा सामोरे जावे लागले. तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार हजार ९३८ हापपंपांपैकी ३४ गावातील नादुरुस्ती पंप एप्रिल महिन्यात बंद होते. पावसाळा लांंबल्याने भूजल पातळी घटली होती. परंतु आता जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाल्याने भूजल पातळीतही वाढ झाली आहे.

प्रकल्पांमध्ये शिल्लक पाणीसाठा

प्रकल्प - टक्केवारी

  • काटेपूर्णा - ३१.३३

  • वान - २५.६४

  • मोर्णा - ४५.३६

  • निर्गुणा - ४७.११

  • उमा - १७.३२

  • दगडपारवा - ५६.६२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT