Nagpur  Sakal
अकोला

Akola: मुलांचे सक्षमीकरण व बाल कामगार निर्मुलनासाठी जिल्ह्यात खास योजना

जिल्ह्यात राबविणार अनाथ मुले सक्षमीकरण व बाल कामगार निर्मुलन योजना

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आई-वडिलांच्या अकाली निधनामुळे व अन्य कारणांमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या हाताला काम देवून त्यांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. यासोबतच कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे बालमजुरी वाट्याला आलेल्या मुला-मुलींची या जाचातून सुटका होवून त्यांच्या पालकांची स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने खास योजना सुरु केली आहे. ‘अनाथ मुले सक्षमीकरण व बालकामगार निर्मुलन योजना’ असे या योजनेचे नाव.

परिस्थितीमुळे अनाथपण आणि बालमजुरी वाट्याला आलेल्या मुलांचे बालपण कोमेजू नये, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा व तहसिलदारांच्या अध्यक्षतेत तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आल्या आहेत. शासकीय धोरणानुसार अनाथ मुलांना वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर बालसुधार गृह, अनाथालयात वास्तव्य करता येत नाही. अशा मुलांची फरफट होवू नये म्हणून ‘अनाथ मुले सक्षमीकरण व बाल कामगार निर्मुलन योजनेच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. यानुसार १८ वर्षांपेक्षा जास्‍त वय झालेल्या मुलांना व्यवसाय करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंतचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय समिती असे कार्य करते

सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी आणि प्रकरणांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्या आली आहे. ही समिती मुख्यत्वे तालुका स्तरीय समितीकडून आलेल्या अर्जांची छाननी करून त्यास मान्यता देते आणि संबंधित प्रकरण बँकेकडे पाठविण्याचे व त्यास मंजुरी देण्यास सहकार्य करते. जिल्हा नियोजन समिती मार्फत हमीसाठी द्यावयाच्या निधीची तरतूद करून घेणे आवश्यक आहे. या समितीच्या माध्यमातून बाल कामगार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात येते. १८ वर्षांवरील अनाथ मुलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे व त्यांना व्यवसाय सुरु करण्यापूर्वी प्रशिक्षणाची व्यवस्थाही समितीच्यावतीने करण्यात येते. या योजनेंतर्गत तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येते. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदी या समितीचे सदस्य असतात.

समर्पक बदल घडण्याचा विश्वास

एका बलशाली राष्ट्रनिर्माणासाठी त्या देशातील बालकांना पोषक वातावरण मिळणे आवश्यक असते. समाजव्यवस्थेत अनाथ व बाल कामगार म्हणून जीवन जगणाऱ्या मुलांना पाठबळ देवून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘अनाथ मुले सक्षमीकरण व बाल कामगार निर्मुलन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून समर्पक बदल घडून येणार असल्याचा विश्वासही प्रशानाला आहे.

बालकामगारांच्या पालकांनाही सहाय्य

पालकांची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे अनेक पालकांना त्यांच्या पाल्यांना बालमजुरीच्या विळख्यात ढकलावे लागते. पर्यायाने खेळण्या, बागडण्या व शिक्षण घेण्याच्या वयात मुलांना बाल कामगार म्हणून विविध ठिकाणी कामे करावी लागतात. या समस्येचे मूळ शोधून पालकांनाच व्यवसाय करण्यास मदत करण्याचा स्तुत्य पैलू या योजनेचा आहे. बाल कामगार प्रतिबंधक समितीच्या पथकास कार्यवाही दरम्यान बालकामगार आढळून आल्यास बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या पालकांना लघु व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. कुंटुंबाला व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेमार्फत ५० हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देऊन व्यवसाय प्रत्यक्ष सुरु करून करण्यास मदत करण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT