Funding sakal
अकोला

Funding : ‘विधानसभा’ निवडणुका तोंडावर; निधी मिळेना,आमदारांची कसरत

लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात आली असून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विकास निधी प्राप्त होत आहे. परंतु आमदारांना मात्र त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी निधी मिळाला नसल्याने त्यांची चांगलीच कसरत होत आहे.

सुगत खाडे

अकोला : लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात आली असून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विकास निधी प्राप्त होत आहे. परंतु आमदारांना मात्र त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी निधी मिळाला नसल्याने त्यांची चांगलीच कसरत होत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही स्थिती असल्याने मतदारसंघात विकास कामांसाठी निधी देऊन मतांचा जोगवा मागण्यासाठी जाण्याचे आमदारांचे स्वप्न अपूर्ण राहते की काय, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता यावीत म्हणून प्रत्येक आमदाराला शासनाकडून निधी दिला जातो. यात पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी-मोठी कामे करता येतात. छोटी-छोटी कामे करून मतदारांना खुश करण्याकरिता आमदार निधीचा आमदारांना उपयोग होतो.

आमदार निधीतून कामे केल्यावर त्या-त्या भागांमध्ये आमदारांकडून फलक लावून जाहिरातबाजी केली जाते. निवडणुकीत मते मागण्यासाठी या निधीचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे आमदार निधी हा आमदारांसाठी महत्वाचा असतो. परंतु आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षात आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करता यावी यासाठी अद्याप एक रुपयांचाही निधी मिळाला नाही. नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. परंतु आमदारांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निधी मिळाला नसल्याने आमदार व त्यांचे समर्थक मात्र निधीची प्रतीक्षा करीत आहेत.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील आमदारांना अद्याप आमदार निधी मिळाला नाही. त्यात अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश आहे. अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्याने अकोला पश्चिमची जागा रिक्त आहे. याव्यतिरिक्त विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी व वसंत खंडेलवाल यांना ही विकास कामांसाठी अद्याप निधी मिळाला नाही.

प्रत्येकी ५-५ कोटीचा निधी

राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी मिळणारा आमदार निधी पाच कोटी रुपये करण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यामुळे गत दोन वर्षांपासून आमदारांना एका वर्षात विकास कामांवर खर्च करण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटी रुपये मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

SCROLL FOR NEXT