बाळापूर - फसवणूकीच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी सहा. पोलिस निरीक्षकास लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अटक केली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. समाधान रेठे असे या लाचखोर पोलिस अधीकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, महीण्याभरापुर्वी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात आरोपीला सहकार्य करण्यासाठी न्यायालयाचा लिपीक व एका हॉटेल चालकाच्या माध्यमातून सहा. पोलीस निरीक्षक समाधान रेठे, यांनी दिड लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी नंतर ९० हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार ठरल्या प्रमाणे आज गुरुवारी न्यायालयाच्या परीसरातील एका हॉटेलवर सहा. पोलीस निरीक्षक समाधान रेठे, लिपीक कपले व हॉटेल चालक गोवर्धन कांबेकर तिघेजणांना नव्वद हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला एसीबीने अटक केली. आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.