MLA Nitin Deshmukh 
अकोला

MLA Nitin Deshmukh's Son : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला; सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

अकोला,ता.29: बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी याच्यावर रविवारी दुपारी साडेचार वाजता प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. सराईत गुन्हेगाराकडून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. शहरातील सिविल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी नगरात घडलेल्या या घटनेनंतर शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिया दिला. 

सविस्तर असे की, आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी देशमुख हा सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत स्वाद बेकरीसमोरच्या कपड्याच्या दुकानावर उभा होता. काही युवक त्या ठिकाणी आले आणि अचानक त्याला बेदम मारण्यास करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्याचा मित्र धावत दुकानात शिरला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.  घटनेत पृथ्वीला व त्याच्या मित्राला दुखापत झाली आहे.

शिवसैनिक पोलिस ठाण्यात 

आमदाराच्या मुलावर हल्ल्याची झाल्याची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याचे समजते. आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलिस ठाण्यात पोहाचले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

शहर असुरक्षित: आमदार देशमुख 

अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलीस यंत्रणेवर टीका केली आहे. जर पोलीस गुंडांचा बंदोबस्त करणार नसतील तर आम्हाला मैदानात उतरावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आमदारपुत्रावरील हल्ल्यानंतर बाळापूर पोलीस अलर्ट

या घटनेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बाळापूर पोलीस अलर्ट मोडवर आले असून शहरातील घडामोडीवर पोलीसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

शिवसेना आमदारपूत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुंडांनी अचानक हल्ला केला आहे. या घटनेची माहिती जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून शिवसेना कार्यकर्ते पेटून उठले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. या घटनेमुळे बाळापूर शहरात काही अप्रीय घटना घडू नये यासाठी बाळापूर ठाणेदार अनिल जुमळे यांनी ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीच्या सुचना दिल्या असून बाळापूर शहर व परीसरात नजर ठेवून आहेत. शहरात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.

_ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अलर्ट मोडवर आहेत. शहरात सध्या शांतता आहे. आम्ही सगळीकडे लक्ष ठेऊन आहोत.

- अनिल जुमळे

ठाणेदार बाळापूर पोलीस स्टेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Musheer Khan: गंभीर अपघातानंतर भारतीय क्रिकेटर मुशीर खानने वडिलांसह पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाला

Assembly Elections: ठाकरे गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? बड्या नेत्याने दिवसच सांगितला! काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates: पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत - ठाकरे

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन! सायबर गुन्हेगारांचे फसवणुकीचे ‘हे’ 10 फंडे; सोशल मीडियावरील बंद असलेले खाते डिलीट करण्याचाही सल्ला

SCROLL FOR NEXT