bhaubeej 2023 sister saves brother life donating liver organ donation Sakal
अकोला

Bhaubeej 2023 : बहिणीच्या जिद्दीपुढे संकटही झुकले; भावाला यकृत देवून भाऊबीज साजरी

भाऊ बहिणीच नातं म्हणजे त्यातील जिव्हाळा प्रेम हे मातृत्व व दायित्व यांच्या पलिकडचे.भाऊ माझा पाठीराखा हे समाज मनात आपण पाहातो

गजानन काळुसे

भाऊ बहिणीच नातं म्हणजे त्यातील जिव्हाळा प्रेम हे मातृत्व व दायित्व यांच्या पलिकडचे.भाऊ माझा पाठीराखा हे समाज मनात आपण पाहातो.परंतु बहीणीने सुद्धा मातृत्व व दायित्वची भूमिका पार पाडले असल्याचे दिसून आले आहे.आजारी असलेल्या भावासाठी ती भावाला यकृत दान करून दुर्गा भावाची पाठीराखी बनली आहे.

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील रहिवासी दुर्गा अरुण धायतडक यांनी त्यांचा भाऊ रमेश नागरे यांना स्वतःचे यवृत देवून यशस्वीपणे प्रत्यारोपण झाले असल्यामुळे बहिणीकडून यावर्षीच्या भाऊबीज सणाला आगळीवेगळी भेट लहान बहिणी कडुन मोठ्या भावाला भेट दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की,देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा येथील रहिवाशी रमेश नागरे वय ४८ वर्षे यांना सन २०१९ पासुन यांना नेहमी पोटाचा आजार,अन्नपचन न होणे,उलटी होणे यासह आदी लक्षण दिसत असल्यामुळे तसेच नेहमी आजारी पडत असल्यामुळे त्यांनी डॉक्टरकडे जावुन तपासणी केली असता त्यांना यवृतांचा आजार असल्याचे डॉक्टरानी सांगितले.

त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी नगर, पुणे यासह विविध शहरातील नामांकीत रुग्णालयामध्ये जावून उपचाराला सुरुवात केली.परंतु उपचार करून सुद्धा आजारामध्ये काहीच बदल होत नसल्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने तातडीने यवृत प्रत्यारोपण करणे गरजेचे होते.त्यासाठी दोघांचे रक्त गट सुद्धा जुळणे आवश्यक असल्यामुळे व रक्त गट जुळून सुध्दा यवृत देण्यासाठी कुटुंबातील व नातेवाईकांमधील व्यक्ती समोर येणे सुद्धा आवश्यक होते.

कुटुंबातील व नातेवाईकातील विविध सदस्यांचे रक्त गट तपासणी करण्यात आली परंतु रक्त गट जुळत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली परंतु शेवटी यवृतांने आजाराने ग्रस्त असलेले रमेश नागरे यांच्या लहान बहीण दुर्गा यांची रक्त तपासणी करण्यात आली दोघांचाही रक्तगट ओ पॉझिटिव्ह जुळून आल्यामुळे बहिण दुर्गा यांनी क्षणाचाही विलंबना न लावता यवृत देण्यासाठी तयार झाल्या त्यांचे पती अरुण धायतडक यांनी सुद्धा त्याला होकार दिला.

मुंबईतील नामांकीत ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर रमेश नागरे यांच्यावर यकृत प्रत्यारोपांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.दुर्गा धायतडक यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे.

बहिणीच्या जिद्दीपुढे संकटही झुकले असल्याचे यानिमित्ताने पहायला मिळाले.यावर्षीच्या भाऊबीजेला बहिणीकडून भावालाच आगळीवेगळी भेट दिली असल्याचे पहायला मिळाले. दुर्गा धायतडक यांच्या या धाडसाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.रमेश नागरे व दुर्गा धायतडक यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT