बुलडाणा : संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, असे खुले आवाहन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. ते बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत भाजप आमदार संजय कुटे यांच्यावर टीका केली.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनुदार उद्गार काढल्यानंतर आता बुडडाण्यात भाजप व शिवेसेनेच्या कार्यकर्त्यांमधला वाद पेटला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आज गायकवाड यांचे पुतळा जाळला तर शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला.
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर माजला आहे, रुग्णांना रेमडीसीवीर, ऑक्सीजन, बेड मिळेनासे झाले. ते मिळण्यासाठी राज्य सरकार केन्द्राकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे मात्र केंद्र सरकारकडून कुठलीच मदत मिळेनाशी झाल्याने बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वास्तव आपल्या वक्तयव्यातुन मांडले मात्र बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांमुळे भाजपाने सुद्धा आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध आगपाखड़ केली
जळगाव जामोद येथील भाजपा अंदाराने १४४ कलम मोडित काढत ५० ते ६० जणांना घेऊन चौकात संजय गायकवाड़ यांचा पुतळा जाळला प्रचंड़ घोषणाबाजी केली तसेच बुलढाणा येथे सुद्धा भाजपा नेते विजयराज शिंदे यानी सुद्धा आमदार गायकवाड़ यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसैनिकानी मज्जाव केला व लोटपाट झाली त्यांमुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये एकमेकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी जमा झाले होते.
सायंकाळपर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते. दरम्यान बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शिवसैनिकानी देवेंद्र फडणवीस व भाजपा आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला यावेळी शिवसैनिकानी भाजपा च्या संजय कुटे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मोताळा येथे सुद्धा शिवसैनिकानी भाजपा आमदार संजय कुटे यांचा पुतळा जाळला.
संपादन - विवेक मेतकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.