अकोला

मनपा आयुक्तपदी बोडके; जितेंद्र पापळकर हिंगोलीचे जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिका आयुक्तपदी जी. एम. बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची मनपा आयुक्तपदी तर आयुक्त अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पापळकर यांनी आयुक्तपदाचा प्रभार स्वीकारला नाही. परिणामी अरोरा यांच्याकडेच आयुक्ताचा प्रभार कायम होता. (Bodke-Now-Municipal-Commissioner-District-Collector-of-Jitendra-Papalkar-Hingoli-Akola-nad86)

यापूर्वी शासनाने दिलेल्या आदेशात काही बदल करून १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे नव्याने आदेश शुक्रवारी काढले. त्यानुसार पापळकर यांची हिंगोली जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली तर अकोला मनपाच्या आयुक्तपदी जी. एम. बोडके यांची नियुक्ती करण्यात आली. ते महावितरणच्या कोकण परिक्षेत्र कल्याण येथे सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची हिंगोली जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती.

मात्र, त्यांच्या बदली आदेशातही बदल करून मनपा आयुक्तपदावर नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी कल्याण-डोंबवली महानगरपालिकेचे आयुक्तपद सांभळले आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने अकोल्याला अनुभवी आयुक्त मिळाले आहेत. ते कधी रुजू होणार की याबाबत मनपा वर्तुळात उत्सुकता आहे.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी बियाणे महामंडळात

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची मनपा आयुक्तपदी झालेल्या बदलीत अंशतः बदल करून हिंगोली जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे. त्यामुळे महाबीजला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. यापूर्वी जयवंंशी यांची बदली पुणे येथे महिला व बाल कल्याण आयुक्तपदी करण्यात आली होती.

(Bodke-Now-Municipal-Commissioner-District-Collector-of-Jitendra-Papalkar-Hingoli-Akola-nad86)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT