घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील सोनाटी येथे आज (ता. 25) हरभरा पिकांची काढणी सुरू असताना हात मजुरीवर पोट असणार्या युवकाचा काम करीत असताना ट्रॅक्टर मळणीयंत्रात अडकून मृत्यू झाला.
समाधानच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असून, वडिलाचा गंभीर आजाराने सहा महिन्याअगोदर मृत्यू झाला तर लहान भाऊ मतिमंद असल्यामुळे घराची जबाबदारी समाधानवर येऊन ठेपली होती.
घरात विधवा आई, गतिमंद भाऊ त्यामुळे समाधान मोलमजुरी करत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी पेलत होता. विधवा आईचा दवाखाना, मतिमंद भावाची खाण्यापिण्याची जबाबदारी या कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा कधी काम होते कधी काम मिळत नव्हते अशा कठीण परिस्थितीत समाधान काबाडकष्ट करत होता.
समाधान रमेश गिरी (वय 22 वर्ष) हे त्या युवकाचे नाव. तो दत्ता किसन बदर यांच्या असलेल्या ट्रॅक्टर मळणीयंत्रावर हरभरा काढणीसाठी कामावर होता. नंदकिशोर बदर यांच्या शेतातील हरभरा पिकांची काढणी चालू असताना दुपारी अंदाजे 12. 30 दरम्यान सोनाटी शिवारात अचानक समाधान गिरी मळणी यंत्राच्या टपात गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेने सोनाटी गावातील अनेकांचे डोळे पाणावले. त्या विधवा आई व गतिमंद भावावर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला. याबाबतची माहिती सोनाटीचे सरपंच कुंदन होले यांनी सकाळ ला देत हळहळ व्यक्त केली.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर
|
|||
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.