Buldana Accident News  sakal
अकोला

Buldana Accident News : भाविक महिलांची क्रुझर ट्रॉलीला धडकली ;श्रींचे दर्शनास येत होते शेगावला,दहा जखमी

परभणी जिल्ह्यामधील नऊ महिला भाविक शेगावला श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असताना त्यांची क्रुझर रस्त्यालगत पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली.

सकाळ वृत्तसेवा

शेगाव : परभणी जिल्ह्यामधील नऊ महिला भाविक शेगावला श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असताना त्यांची क्रुझर रस्त्यालगत पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. यामध्ये चालकासह एकूण दहा जण जखमी झाले. त्यापैकी तीन महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्या. सदर घटना खामगाव शेगाव रोडवर माऊली वॉटर पार्क नजीक २४ जून रोजी पहाटे अडीच वाजता घडली.

खामगाव जवळी खदान मधून गिट्टी घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर चालकाने सदर ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यालगत उभी करून ठेवली होती. खामगाव शेगाव रोडवर ही ट्रॉली उभी असताना रात्री शेगावकडे येणाऱ्या एमएच २४ एएफ ५९३८ क्रमांकाच्या क्रूझर गाडीने या ट्रॉलीला मागून धडक दिली. यामध्ये क्रुझर चे मोठे नुकसान झाले आहे. क्रूझरमधील नऊ प्रवासी महिला तसेच चालक जखमी झाला. यापैकी तीन महिला गंभीर असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

सदर अपघातामध्ये सरिता संजय पवार (वय ४० वर्ष), जयश्री रामप्रसाद कदम (वय ४०) कुसुम अश्रुबा कदम (वय ५०), शिल्पा कैलास कदम (वय ५०), तारामती दादाराव घुंबटे, ऋतुजा नितीन कदम (वय ४५), विजयमाला विठ्ठल कदम (वय ६०), सुशीला चंद्रकांत कदम (वय ४५) नेहा नितीन कदम (वय ४५), तसेच क्रुझर चालक बंडू दिगंबर चिमटे (वय ४५), सर्व राहणार रामेटाकळी मानवत, जिल्हा परभणी असे सर्व जण जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून यापैकी सरिता संजय पवार, जयश्री प्रसाद कदम, तारामती दादाराव घुंबटे या तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले आहे. शेगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये २४ रोजी सायंकाळपर्यंत या अपघाताची नोंद नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT