सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : शेतकरी नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. कमी जमीन असणारा शेतकरी सुद्धा चांगल्या फुल शेतीतून उत्पादन मिळू शकतो हे दाखवून दिले आहे सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथील युवा शेतकरी मदन झोरे यांनी फुलशेती करून युवा पिढीला एक आदर्श घालून दिला आहे. त्यांनी एक एकर मध्ये शेवंती फुलशेती ची निवड केली, मागील दोन वर्षापासून लोक लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.
त्यामुळे त्यांनी फुलशेती कडे वळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यामध्ये ते यशस्वी होताना दिसून येत आहे. त्यामुळे युवा पिढीतील शेतकऱ्यांनी फुलशेतीचे आवाहन शेतकरी मदन झोरे यांनी केले आहे. फुलशेतीतून तीन ते साडे तीन लाखाचे उत्पन्न होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वडिलोपार्जित जमिनी मध्ये पारंपरिक पिकांची लागवड केली जात होती परंतु लागवडीचा खर्च वजा जाता हातामध्ये काहीच शिल्लक राहत नव्हते त्यामुळे त्यांनी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला आणि पारंपरिक पिकाला फाटा देत फुल शेतीते यशस्वी झाल्याचे हे ते सांगतात फुल शेती करत असताना वडील रामदास झोरे,आई सिंधुबाई झोरे, पत्नी वर्षा झोरे यांची मोठी मदत त्यांना झाली. त्यांचे लहानपणीचे मित्र कैलास खरात यांना सुद्धा त्यांनी फुल शेती करण्यास प्रवृत्त करून फुलशेतीकडे वळवले आहे तेसुद्धा फुलशेतीचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात.
मदन झोरे यांनी मे 2020 मध्ये फुल शेती करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांनी रतलाम शेवंतीची निवड केली. मित्रांच्या मदतीने ८ हजार शेवंतीचे रोपे आणुन एक एकर मध्ये त्याची लागवड केली. एक एकर शेतीची चांगल्या प्रकारे मशागत मशागत केली.त्यामध्ये शेणखताचा वापर केला.त्यानंतर मातीचा भराव टाकून एक एकर मध्ये वळंबा पद्धत तयार केली त्यावर रोपांची लागवड केली रोपांना पाणी देण्यासाठी ठिबक चा उपयोग केला, फवारणी आणि खताचा व्यवस्थापन करून वेळोवेळी फवारणी आणि खताचा वापर केला.
त्यानंतर झाडांची चांगल्याप्रकारे वाढ झाली नोव्हेंबर 2021 मध्ये शेवंती फुलांची चांगल्या वाढ झाली तोडणीला आल्यामुळे दीपावलीचा सण असल्यामुळे फुलांना मागणी वाढली, फुलांच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून व्यापाऱ्यांना थेट शेतातून फुले पोहोचवण्याचे काम केले त्यामुळे चांगल्या प्रकारे शेवंती फुलांना भाव मिळाला. दीपावलीच्या सणामध्ये एक ते दीड लाखा रुपयांचे फुलांची विक्री होवून चांगले उत्पादन झाले.दोन तोडण्या झाल्या असुन ८ जोडण्या फुलांच्या बाकी आहेत.त्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
दररोज नागपूर औरंगाबाद यासह इतर ठिकाणी फुलांची विक्री
दररोज नागपूर, जालना, औरंगाबाद या ठिकाणी फुलांची थेट विक्री केली जाते. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा देऊळगाव राजा येथील स्थानिक फुल विक्रेते थेट शेतामधून फुले घेऊन जातात.त्यामुळे शेतकऱ्याला ही चांगल्या प्रकारे फुलांना भाव मिळतो. किनगांव राजा येथील शेवंतीचे फुले हे उपराजधानीत जात असल्याचे समाधान हे शेतकऱ्यांनी व्यक्त केले. शेवंती बरोबरच गुलाबाचे फुले सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री शेतकऱ्यांकडुन केली जात आहे.
तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन होण्याची अपेक्षा
एक एकर मध्ये शेवंतीची लागवड करून फुलशेती फुलवली आहे शेतकरी मदन झोरे यांना एक एकर मध्ये तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. मजुर, फवारणी, खत यांचा खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजच्या पिढीमध्ये शेतकऱ्यांनी प्रयोगशील बनण्याची गरज आहे शेतकरी स्वतः प्रयोगशील झाला तरच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करू शकतो आणि त्यामधून उत्पन्न घेऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपारिक पिके घेण्याबरोबरच शेतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुद्धा फुलशेतीची लागवड करावी फुलशेती मधून सुद्धा शेतकरी लाखो रुपये चा नफा मिळू शकतो. त्यामुळे नवीन पिढीने फुल शेती कडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे.
- मदन झोरे, शेतकरी, किनगाव राजा, ता. सिंदखेड राजा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.