लग्नातील डिजेच्या गाण्यावरुन वरातीवर हल्ला  Sakal
अकोला

Buldhana News : लग्नातील डिजेच्या गाण्यावरुन वरातीवर हल्ला ; दोन समाजातील सोळा आरोपीवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

धाड : लग्नाच्या वरातीत डिजेवर वाजविण्यात येणाऱ्या गाण्यावरुन भावना दुखाल्यामुळे एका विशिष्ट समाजातील लोकांनी रस्त्याहून जाणाऱ्या वरातीत सहभागी मंडळीवर हल्ला करून बेदम मारहाण केली.

यात काही वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना बोरखेड येथे 30 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. दोन्ही समाजातील लोकांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरुन सोळा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तेरा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहीती नुसार, येथुन जवळच असलेल्या बोरखेड येथे भगवान तायडे यांच्या मुलीचा विवाह सोहळा 30 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.यासाठी मराठवाड्यातील सोनगिरी येथील वऱ्हाडी लग्नासाठी आली होती.

सायंकाळी नवरदेवाची वरात रस्त्याने काढण्यात आली. दरम्यान वरातीमध्ये डिजेवर गाणे सुरू होते. या गाण्यामुळे विशिष्ट समाजातील काही लोकांच्या भावना दुखावल्या.या कारणावरून त्यांनी वरातीवर हल्ला करुन वादावादी करत हाणामारी सुरू केली. यात चार जण जखमी झाले.असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

या हाणामारी मध्ये सचिन बावस्कर, आनंद बावस्कर, दिपक बावस्कर, गजानन सोनुने हे चार जखमी झाले.डिजेचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद होऊन हाणामाही झाल्याचे दोन्ही गटाकडून परस्परविरोधी पोलिस केलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आली.

सचिन सुखदेव बावस्कर (वय 30) रा बोरखेड यांच्या तक्रारी वरुन आरोपी सादिकखान, शे.जाकिर शे. इजायत, सय्यद अलीम सय्यद सलीम, सहाबाज खान युसुफ खान, आरीफ खान आलम खान, ईब्राहिम खान ईसमाईल खान, ईसमाईल खान फेजान खान, सय्यद सोहिल सय्यद खलील, सय्यद गफार अश्या नऊ आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

तर ईब्राहिम खान हमीद खान याच्या तक्रारी वरुन दिलीप तेजराव बावस्कर, सचिन सुखदेव बावस्कर, नितीन समाधान बावस्कर, गणेश वाघ, आदेश बावस्कर, सोनु बावस्कर या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चार जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील डिजे पोलिसांनी जप्त करून कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT