नारीशक्ती धडकली पोलिस स्टेशनला  sakal
अकोला

बुलडाणा : दारूसह अवैध धंदे बंद करा; नारीशक्ती धडकली पोलिस स्टेशनला

तत्काळ बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील महिलांनी सातत्याने बेकायदेशीर दारू, जुगार, वरली बंद करण्यासाठी लढा दिला. परंतु, अपयश आले. बेकायदेशीर व्यवसाय करणारे इतके मुजोर झाले आहे की, पोलिसांसोबत लागेबांधे असल्याचे सांगत जुमानत नसल्याचा आरोप रोहिणखेड येथील महिलांनी धामणगाव बढे पोलिसांवर केला असून, तत्काळ बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली आहे.

धामणगाव बढेसह पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गावामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसाय विरोधात अनेक तक्रारी देऊनही प्रतिबंध घालण्यात आलेला नाही. उलटपक्षी पोलिसांचे आशीर्वादाने खुलेआम व राजरोसपणे वरली, मटका, बेकायदेशीर दारू विक्री बंद होण्याऐवजी अधिकच प्रमाणात वाढले आहे. या व्यावसायिकांना अनेक महिलांच्या सुखी संसाराची राखरांगोळी होत असल्याने अनेक महिलांमध्ये पोलिस प्रशासनाचे कार्य प्रणालीवर रोष अनावर होत शेकडो महिला एकत्रित येत बेकायदेशीर व्यवसाय वरली, मटका, दारू विक्री बंद करण्यासाठी गावात विक्री होत असलेल्या ठिकाणावरही हल्लाबोल करत दारूच्या रिकाम्या बॉटलच खच बाहेर काढला.

यानंतर धामणगाव बढे पोलिस प्रशासनाचे निष्क्रिय कार्याविरुध्द पोलिस स्टेशनमध्ये संतप्त होत बेकायदेशीर व्यवसाय बंद करा अशा घोषणा देत रोष व्यक्त केला. याप्रसंगी धामणगाव बढे पोलिस स्टेशनच्या प्रांगणात 700 ते 800 च्या जवळपास महिलांचे उपस्थितीत ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांना बेकायदेशीर व्यवसायासह बेकायदेशीर दारू विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले.

बेकायदेशीर व्यवसायाविरोधात गावकर्‍यांचे तक्रारीसह अनेकवेळा मागणी केल्यानंतरही त्या बेदखल करून ग्रामपंचायत ठरावाची खिल्ली उडवत बेकायदेशीर व्यवसायाला अभय दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलीन करणार्‍यांविरोधात जिल्हा पोलिस प्रशासन गंभीर दखल घेत कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काय दखल घेणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीने दिला ठराव

गावातील बेकायदेशीर जुगार, वरली, दारू विक्री तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी 2 ऑक्टोबरला घेतलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली. यावर ग्रामपंचायतीने सदर ठराव पारित करत पोलिस प्रशासनाला दिला. परंतु, याकडेही स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे एकप्रकारे ग्रामपंचायतीच्या ठरावाला केराची टोपली तर नाही ना दाखविली अशी चर्चा आहे.

महिलांचा दारू विक्री ठिकाणी हल्लाबोल

रोहिणखेड येथील महिलांनी वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची दाखल पोलिस प्रशासनाने न घेतल्यामुळे अखेर महिलांनी आक्रमक होत गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या लघु व्यावसायिकांकडे विक्री होत असलेल्या दारू विक्री केंद्रावर हल्लाबोल करत तेथील रिकाम्या बाटल्यांचा खच बाहेर काढत दारू विक्री प्रमाण दर्शविले. यावेळी दुकानाचे कुलूप तोडून बॉटल बाहेर काढण्यात आल्या तसेच गावातून रॅलीही काढण्यात आली. दुर्लक्ष तर नाही ना अशी चर्चा होत आहे.

वरिष्ठांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष का?

धामणगाव बढे परिसरात असलेल्या बेकायदेशीर व्यवसायविरोधात यापूर्वीही शिवसेना तसेच माळी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन देऊन एकप्रकारे एल्गार पुकारला होता. त्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले असून, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या मागणीकडेही दुर्लक्ष केल्यामुळे वरिष्ठांचेही तर याकडे जाणीवपूर्वक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT