Pavitra Portal sakal
अकोला

Pavitra Portal : पवित्र पोर्टलवरील चुकीने एलएलबी बी.एड्. विद्यार्थ्यांवर अन्याय

कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण करीत बी. ए. पदवी प्राप्त करीत बि.एड्. झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण करीत बी. ए. पदवी प्राप्त करीत बि.एड्. झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. पवित्र पोर्टलवर पदवी शिक्षणासाठी दिलेल्या पर्यायामध्ये बी.ए. इन एलएलबी हा पर्यायच दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अर्ज करताना संभ्रम निर्माण झाला आहे.

शिक्षक भरतीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहे. मात्र, या संकेत स्थळावरील चुकांमुळे अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यातच आता कायद्याचा अभ्यासक्रम (बी.ए. इन लॉ, एलएलबी) पूर्ण करून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बी. एड्. झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पवित्र पोर्टलवर पदवी पर्यायामध्ये बी.ए. इन लॉ, एलएलबी हा पर्यायच उपलब्ध करून दिलेला नाही.

अकोला येथील प्रज्ञा राऊत या विद्यार्थिनीने ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तिने जिल्हाधिकारी अकोला यांना दिलेल्या निवेदनामध्ये पवित्र पोर्टलवरील पर्यायामध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना येत असलेल्या अडचणीकडे लक्ष वेधले आहे.

बी. एड्. अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी सीईटी सेलने पदवी अभ्यासक्रमात ‘बी. ए. इन लॉ’ हा पर्याय दिला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी दोन वर्षे बी.एड्. अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र, आता त्यांनी घेतलेल्या पदवी शिक्षणाचा शिक्षक भरतीमध्ये उल्लेखच नसल्याने अर्ज करताना अडचणी येत आहे.

कागदपत्र तपासणीत येणार अडचण

बी.ए. इन लॉ, एलएलबी हा पर्यायच पवित्र पोर्टलवर देण्यात आलेला नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांनी बी.ए. हा पर्याय निवडून अर्ज करीत आहेत. ज्यावेळी कागदपत्र तपासणीसाठी बोलविले जाईल, तेव्हा अर्जात उल्लेखीत केल्याप्रमाणे बी. ए. चे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. प्रत्यक्षात बी. ए. इन लॉ हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर बी. ए. इन लॉ, एलएलबी असा उल्लेख असल्याने कागदपत्र पडताळणीत त्यांचा अर्ज चुकीचे कागदपत्र सादर केल्यामुळे बाद होण्याची भिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT