अकोला :रविवारी जाहिर झालेल्या एमएचटी-सीईटीच्या नुकत्याच जाहिर झालेल्या निकालात अकोल्याच्या सृजन गजानन आत्राम या विद्यार्थ्यांने उत्तम कामगिरी केली असून संपूर्ण महाराष्ट्रात गरुड झेप घेतली आहे.
अनुसुचीत जमाती (एसटी) प्रवर्गातून पीसीबी गटात अकोल्याच्या सृजन गजानन आत्राम याने ९९.९७ पर्सेंटाईल मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. सृजनला नीट परीक्षेत ६७० गुण मिळाले आहेत. तसेच जेईई मेन्सच्या निकालात देखील बाजी मारत त्याने ९७.४० टक्के गुण प्राप्त केले. सृजनच्या यशाने अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अकोल्यातील ब्राईट करिअर इंस्टिट्युटचा विद्यार्थी सृजनने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांसह ब्राईट करिअर इंस्टिट्युटचे संचालक डॉ. अभय पाटील व हरनीतसिंग यांना दिले आहे. सृजनचे वडील डॉ. गजानन आत्राम हे अकोला जीएमसी मध्ये फिजिओलॉजी विभागाचे प्रमुख आहेत तर आई डॉ. प्रज्ञा ह्या असोसिएट प्रोफेसर आहेत.
ब्राईट करिअरमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष दिले जात असल्यामुळे निकालात देखील विद्यार्थी यशस्वी होतात असे मत सृजनने व्यक्त केले. भविष्यात सृजनला न्युरोसर्जन होण्याची इच्छा आहे.
सृजनने प्रशासकीय अधिकारी व्हावे, डॉ. पाटील एमएचटी-सीईटी, नीट आणि जेईई-मेन्स ह्या परिक्षा देशातील अत्यंत कठीण स्पर्धा परिक्षा आहेत. यामध्ये सृजनने मिळवलेले यश निश्चितच अकोल्यासह राज्यासाठी कौतुकास्पद आहे. त्याला देशातील नामवंत कॉलेजमध्ये नक्कीच प्रवेश मिळेल यात शंका नाही. परंतू त्याचे अनुशासन, जिद्द व गांभीर्य पाहून त्याने प्रशासकीय सेवेत करिअर करावे असे मत ब्राईट करिअर इंन्स्टिट्युटचे संचालक डॉ. अभय पाटील यांनी व्यक्त केले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.