अकोला ः ‘माझे गाव कोरोना मुक्त’ या अभियानाअंतर्गत कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासोबतच गावातील ४५ वर्षांवरील व दिव्यांगाचे १०० टक्के लसीकरण प्राधान्याने करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील कापशी ग्रामस्थांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा जाणून घेतली. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कापसी येथील सरपंच सदाशिव उमाळे यांच्याशी संवाद साधला. (Chief Minister Uddhav Thackeray interacted with Kapashi Sarpanch of Akola)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियंत्रण करण्यासाठी गावपातळीवर केलेल्या उपाययोजनांबाबत सरपंचांशी दूरदृष्यप्रणालीव्दारे संवाद साधला. त्यात अकोला जिल्ह्यातील कापशीचे सरपंच सदाशिव उमाळे यांचाही समावेश होता. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मुर्तिजापूर तालुक्यातील मधापूरीचे सरपंच प्रदीप ठाकरे, कापसीचे सरपंच सदाशिव उमाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सरपंच सदाशिव उमाळे यांनी गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासह त्रिसूत्रीय नियमाचे (सामाजिक अंतर, हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे) पालन केले.
घरोघरी सॅनीटायझर, मास्क व रोग प्रतिकारक शक्तीवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले. गावात रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलन केले. गावातील परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करून वॉर्डनिहाय प्रतिबंधात्मक नियमाचे पालन केले. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या चाचण्या केल्या तसेच त्यांना विलगीकरणात ठेऊनच गावात प्रवेश देण्यात आला. त्यासाठी गावात लोकवर्गणीतून सुसज्ज आयसोलेशन केंद्र उभारण्यात आले. या ठिकाणी औषधोपचाराची व्यवस्था केली. आयसोलेशन ठेवण्यात आलेल्या रुग्णांना मनोबल वाढवा यासाठी केंद्रावर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी व आशासेविकांच्या ड्युट्या लावल्या. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी गावातील खासगी डॉक्टरच्या सहाय्याने लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचा संपर्क करुन त्यांचे चाचण्या केल्या जात. यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झाली.
लसीकरणाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर करून लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील ४५ वर्षांवरील पात्र सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. तसेच दिव्यांग व्यक्तीचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रशासन व नागरिकांचे चांगले सहकार्यामुळे कोरोना मुक्त गाव मोहीम ठेवण्यास मदत झाली. संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या असून, गाव कोरोना मुक्त ठेवण्याचा निर्धार सरपंच उमाळे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
संपादन - विवेक मेतकर
Chief Minister Uddhav Thackeray interacted with Kapashi Sarpanch of Akola
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.