akola sakal
अकोला

जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून केले आंदोलन

अतिक्रमण हटाव माेहीम थांबविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गायरान-शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. ही मोहीम तत्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी बुधवारी (ता. १७) बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे नेते भाई जगदिशकुमार इंगळे यांनी आत्मदहनाचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदाेलन केले. पोलिसांनी मध्यस्थी करूत त्यांना खाली उतरविले. अप्पर जिल्हाधिकारी अनील खंडागळे यांच्याशी चर्चा केली. त्यात लवकरच यावर ताेडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायरान अर्थात ई-क्लास जमीन आहेत. त्यावर ग्रामस्थांकडून पिके घेतली जातात. स्थानिक प्रशासनाकडून हे अतिक्रमरण हटविण्यात येते. त्यातून संबंधित शेतकरी, शेतमुजरांचे प्रचंड नुकसान हाेते. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी मूर्तिजापूर तालुक्यात घडला. जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना ई-क्लास जमिनीवर पेरणी करण्यात आलेली पिके घरात येईपर्यंत सवलत द्यावी आणि शासन निर्णयानुसार ता.१४ एप्रिल १९९० च्या अगोदरील अतिक्रमकांना शेत नियमाकुल करून द्यावे, अशी मागणी हाेत आहे. याच मागणीसाठी बिगर सातबारा शेतकरी संघटना तथा दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदिशकुमार इंगळे यांनी कार्यकर्त्यांनासाेबत ता. १७ ऑगस्ट राेजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT