Assembly election 2024 sakal
अकोला

Akola : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला भगदाड,माजी आमदार खतीब यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश, बाळापूरात ‘सेना-वंचित’ लढत

Assembly election 2024 : काँग्रेसचे माजी आमदार खतीब सय्यद नातीकोद्दीन यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने बाळापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : विधानसभा निवडणूकीचे वारे जिल्हयात वाहू लागले आहेत. त्याचा पहिला फटका हा काँग्रेसला बसला. बुधवारी बाळापूर शहरातील रहिवाशी तथा माजी आमदार खतीब सैय्यद नातीकोद्दीन यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने काँग्रेसला भगदाड पडले.

जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वावर नाराजी असलेले काँग्रेसचे अनेक नेते निवडणूकीपूर्वी काँग्रेसला ‘बाय-बाय’ करण्याच्या तयारी असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा चिंतेत पडले आहेत. खतीब साहब यांच्या उमेदवारीने बाळापूर विधानसभा मतदारसंघात आता ‘सेना-वंचित’ लढत पहायला मिळणार आहे.

भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी हे जिल्हयातील महत्वाचे पक्ष मानल्या जातात. त्यामुळे प्रत्येक निवडणूकीपूर्वी मोठे नेते तिकिटासाठी पक्षांतर करीत असल्याचा जिल्हयातील राजकारणाचा इतिहास आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळेसही मोठ्‍या प्रमाणात जिल्हयात पक्षांतरण झाले होते.

त्याचा फटका भाजपाला बसल्याचे वास्तव आहे. विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्षात तिकिटासाठी चढाओढ सुरु आहे. सध्या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, उबाठा, राष्ट्‍रवादी शरद पवार गट असे घटक पक्ष आहेत.

बाळापूर मतदारसंघ हा ‘उबाठा’साठी सुटणार आहे. याठिकाणी सध्या नितीन देशमुख आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला ही जागा सुटलीच नसती. त्‍यामुळे गोची झालेले खतीब यांनी वंचितमध्ये उडी घेतल्याची चर्चा आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने बाळापूर विधानसभा मतदारसंघातून खतीब सैय्यद नातीकोद्दीन यांना उमेदवारी जाहीर झाली.

मुंबईत बुधवारी झालेल्या वंचितच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. काँग्रेसच्या मवाळ हिंदुत्वावर असंतुष्ट असल्याने ज्येष्ठ नेते खतीब सय्यद यांच्यासह अन्य ९ मुस्लिम नेत्यांनी काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यामुळे काँग्रेस पुरती हादरून गेली आहे.

अकार्यक्षम नेतृत्वाचा काँग्रेसला फटका

इतर पक्षांच्या तुलनेत जिल्हयात काँग्रेस खिळखिळी झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा व महानगर पालिका निवडणूकीत काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पक्षातील काही नेत्यांनी पक्ष श्रेष्ठीपर्यंत नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर व शहराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे आगामी काळात अनेक कार्यकर्ते काँग्रेसला सोडून जाण्याच्या तयारी असल्याची वस्तुस्थिती आहे.

बाळापूरात काट्याची टक्कर

बाळापूर मतदारसंघ हा प्रामुख्याने मुस्लीम बहुल मतदारसंघ आहे. यामध्ये पातूर व बाळापूर दोन तालुके येतात. शिवाय या मतदारसंघात विद्यमान आमदार नितीन देशमुख यांचाही दबदबा राहिला आहे. आता काँग्रेसमधील खतीब साहब वंचितमध्ये आल्याने वंचित बहुजन आघाडीची ताकद याठिकाणी वाढली आहे. त्यामुळे आमदार महोदयांसमोर खतीब यांच्या एन्ट्‍रीमुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

काँग्रेसमुळे समाजाला न्याय देऊ शकलो नाहीः खतीब

काँग्रेसमध्ये राहून समाजाला न्याय देता येत नसल्याची खंत खतीब सैय्यद नातीकोद्दीन यांनी बोलून दाखवली. खतीब यांच्या प्रवेशाने बाळापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला रंगत आली आहे. आता याठिकाणी सेना, भाजप, काँग्रेस वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख उमेदवार यांच्यात लढत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT