Crop Damage akola Sakal
अकोला

Crop Damage : शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने काँग्रेसने घातले सरकारचे ‘श्राद्ध’

Congress Protest :अकोल्यात सततच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन नुकसानीबद्दल मदत न मिळाल्याने काँग्रेसने अभिनव पद्धतीने सरकारचे 'श्राद्ध' घालून निषेध नोंदवला.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या, या मागणीसाठी काँग्रेसकडून सोमवारी अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ झाला. त्यानंतर सरकारचा निषेद नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यात काँग्रेसने सर्वपित्री अमावस्येला सरकारचे श्राद्ध करत शेतकरी विरोध धोरणांचा निषेध नोंदवला.

यंदा खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने आधीच उत्पादन घटले. अशातच गत काही दिवसांपासून बाळापूर तालुक्यात प्रचंड पाऊस पडत आहे. हे कमी की काय सोयाबीनला एकही शेंग आली नसल्याचा प्रकार पारस, जोगलखेड, अडोशी कडोशी, डोंगरगाव, हसनापूर, टाकळी निमकर्दा, लोहारा, उरळ या परिसरातून समोर आला.

परिणामी उत्पादनच होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. गत आठवड्यातही नुकसानीचे सर्वेक्षण करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. दरम्यान बुधवारी काँग्रेसने सरकारचे श्राद्ध घातले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी आमदार बबनराव चौधरी, मदन भरगड, कपिल रावदेव, प्रकाश तायडे, तश्वर पटेल आदी होते.

शेतकऱ्यांचा मुद्दा आता थेट जनतेत

आता मुद्दा थेट जनतेच्या दारात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू आहे. अन्नत्याग आंदोलनात अनेक नेते सहभागी झाले. त्यामुळे काँग्रेस निरीक्षकांनी आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असून शेतकऱ्यांचा मुद्दा थेट जनतेमध्ये नेण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अमानकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT