अकोला : कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त १० रुग्णांचा गुरुवारी (ता. २७) मृत्यू झाला. त्यासोबतच २०५ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ५७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५ हजार २९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. (Corona Cases in Akola10 more patients died; 205 new patients)
कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी जिल्ह्यात ८८६ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७३२ अहवाल निगेटिव्ह तर १५४ अहवाल पॉझिटिव्ह आला. रॅपिडच्या चाचणीत ५१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांच्या संख्येत नव्या २०५ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत १५४ अहवाल पॉझिटिव्ह अहवालात ७५ महिला व ७९ पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूराता १८, अकोट-५६, बाळापूर-०६, बार्शीटाकळी- ०६, पातूर-०३, अकोला तालुक्यात २१ व मनपा क्षेत्रात ४४ नवे रुग्ण आढळले.
असे आहेत मृतक
हिंगणा ता. पातूर येथील ७० वर्षीय पुरुष, खिरपुरी येथील ७४ वर्षीय महिला, मूर्तिजापूर येथील ५२ वर्षीय पुरुष, गौलखेडी ता. मूर्तिजापूर येथील ८० वर्षीय पुरुष, अजनी ता. बार्शीटाकळी येथील ४८ वर्षीय पुरुष, पाथर्डी ता. तेल्हारा येथील ६३ वर्षीय रुग्ण, बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला रुग्ण, दिनोडा ता. अकोट येथील ४५ वर्षीय महिला रुग्ण, सुकोडा येथील ८० वर्षीय महिला रुग्ण, पातूर येथील ६० वर्षीय महिला रुग्णाचा गुरुवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५४७९२
- मयत - १०४७
- डिस्चार्ज - ४८४४९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५२९६
संपादन - विवेक मेतकर
Corona Cases in Akola; 10 more patients died; 205 new patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.